मुंबई - यंदा कोरोनामुळे मुंबईत गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. लालबागचा राजा हा केवळ मुंबईतील भक्तांसाठीच मर्यादित नसून जगभरातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ सामाजिक बांधिलकी राखत अनेक समाजोपयोगी उपक्रम यंदा हाती घेत आरोग्य उत्सव साजरा करत आहे.
यंदा लालबाग मंडळाकडून आरोग्योत्सव साजरा... - लालबाग राजा मंडळ
लालबागचा राजा हा केवळ मुंबईतील भक्तांसाठीच मर्यादित नसून जगभरातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ सामाजिक बांधिलकी राखत अनेक समाजोपयोगी उपक्रम यंदा हाती घेत आरोग्य उत्सव साजरा करत आहे.
मंडळाकडून सिमेवर प्राण गमावलेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गणेश उत्सवाचे 11 दिवस रक्तदान व प्लाझमा थेरेपी उपक्रम राबवण्याचे मंडळाने ठरवले आहे. यंदा आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याचा मानस लालबाग सेवेकऱ्यांनी केला आहे.
दरवर्षी, मुंबईमध्ये मोठ्य़ा दणक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून उंच गणेशमूर्ती आणि आकर्षक भव्य सजावटीमुळे यापैकी बहुतांश मंडळांनी प्रसिद्धी मिळविली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाविकांना आकर्षित करण्याची चुरस गणेशोत्सव मंडळांमध्ये लागली असते, लाखो कोटींची उलाढाल गणेशोत्सवात होते.