महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MVA Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या मोर्चाला लहूशक्तीचा पाठिंबा - Lahu shakti support to Mahavikas Aghadi Morcha

MVA Morcha In Mumbai: महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल ही लाईन डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. ( Mahavikas Aghadi Morcha) यासाठी शिवसेना (ठाकरे गट ) राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्षांनी कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी तयारीला सुरुवात केलीय. (MVA Morcha) प्रत्येक पक्षाने एक लाखाचं टार्गेट ठेवून जवळपास तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट ठेवल आहे.

MVA Morcha In Mumbai
MVA Morcha In Mumbai

By

Published : Dec 16, 2022, 4:59 PM IST

मुंबई:राज्यपाल, सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांची सातत्याने होणाऱ्या विटंबनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi Morcha) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली १७ डिसेंबरला महामोर्चा आयोजित केला आहे. भायखळा येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. विविध संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. लहूशक्ती (lahu shakti sanghatana) या संघटनेने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पाठिंबा जाहीर केला आहे.

राज्यातील जनतेने मोठा प्रतिसाद: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी येत्या शनिवारी १७ डिसेंबर रोजी मुंबईत निघणाऱ्या मोर्चाला राज्यातील जनतेने मोठा प्रतिसाद द्या', असे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून मोर्चाला पाठिंबा देण्यात येतो आहे. महाराष्ट्र मातंग समाज लहुशक्तीने मोर्चाला संपूर्णपणे पाठिंबा दिल्याचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

काय म्हटलय पत्रात:महाराष्ट्र मातंग समाज लहुशक्ती, लोकशाही मार्गाने होत असलेल्या मोर्चामध्ये लोकशाही मार्गानेच ताकदीने सामील होत आहोत. आपला आदेश सर्व लहुशक्तीच्या लहुसैनिकांना याद्वारे कळविला, असून या मोर्चात सर्व लहुसैनिक सहभागी होत आहेत. आपण घेतलेला निर्णय हा महाराष्ट्रातील तमाम सर्व सामान्य व्यक्तिंच्या तसेच शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या आणि सर्वच क्षेत्रातील उपेक्षितांच्या हिताचा आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासोबत आहोत. महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची पायमल्ली होत असतांना आम्हीही महापुरुषांचे वारसदार म्हणून आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत आहोत, असे लहू शक्तीचे प्रदेश प्रमुख श्रीकांत शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

कर्नाटक सीमा वादाचा सुरू असलेला प्रश्न:भाजपचे नेते आणि राज्यपाल यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमा वादाचा सुरू असलेला प्रश्न यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झालीये. लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये ही मोर्चा काढण्यासाठी तयारी सुरू झालीय. पक्षाने जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतपोहोचण्यासाठी तयारी सुरू केलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details