मुंबई- धनगर आरक्षणाच्या याचिकेवर अभ्यास करून पुढील सुनावणी २७ तारखेला करू, असे न्यायालयाने सांगितल्याचे धनगर आरक्षण याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी सांगितले. धनगर आरक्षणाची कागदपत्रे हरवल्याचे वृत्त एका पोर्टलने दिले होते. मात्र, तसे काही झाले नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.
धनगर आरक्षण याचिकेवर २७ मार्चला सुनावणी - petition
धनगर आरक्षणाच्या याचिकेवर अभ्यास करून पुढील सुनावणी २७ तारखेला करू, असे न्यायालयाने सांगितल्याचे धनगर आरक्षण याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी सांगितले.
आज धनगर आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी वकिलांनी धनगर आरक्षणाची कागदपत्रे सापडत नाहीत, अशी माहिती दिल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अशी बातमी एका वृत्तपत्राने दिली होती. मात्र, तसे काही झाले नाही. झाले असल्यास त्याची चौकशी व्हावी, असेही हेमंत पाटील यांनी सांगितले.
संविधान विरोधी व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने दिलेला अहवाल डावलणारे खोटे प्रतिज्ञापत्र आणि काही महत्त्वाची कागदोपत्रे आज उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र, अभ्यासाच्या कारणामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले.