मुंबई : जगभरातील पोलीस दलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वॉन्टेड फरार गुन्हेगारांबद्दल सतर्क करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाते. न्यायालयाने फरार गुन्हेगारांविरुद्धच्या आरोपपत्राची दखल घेतल्यानंतरच ते जारी केले जाऊ शकतात. प्रत्यार्पण, शरणागती किंवा तत्सम कायदेशीर कारवाई प्रलंबित असलेल्या व्यक्तीला शोधून तात्पुरते अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जगभरातील सर्व कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणांना एक विनंती म्हणून काम करत असते. मात्र, इंटरपोलद्वारे कोणकोणत्या नोटीशी बजावल्या जातात, याविषयी जाणून घेऊ.
रेड कॉर्नर नोटीसचा जास्त उपयोग: देश सोडून पळून गेलेल्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगाराची माहिती घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाते. रेड नोटीस हे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध रेड नोटीस जारी केली जाते, तेव्हा समजावे की, त्या व्यक्तीने देशात कोणता तरी गंभीर गुन्हा केला आहे. म्हणजेच तो दोषी आहे. रेड कॉर्नर नोटीस अटक वॉरंटपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. मात्र, इंटरपोलद्वारे जास्तीत जास्त गुनेहगारांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावली जाते. कारण गंभीर गुन्हे केलेलेच आरोपी देश सोडून परदेशात लपून बसलेले आहेत.
तात्पुरती अटक होण्याची शक्यता: रेड नोटीस कॉर्नर नोटीस गुन्हेगाराच्या अटकेसाठी वॉरंट मानली जात नाही. आरोपी सापडल्यानंतर त्याची तात्पुरती अटक होण्याची शक्यता आहे. रेड कॉर्नर नोटीसमध्ये दोन प्रकारच्या नोटीस आहेत. प्रथम- नाव, जन्मतारीख, डोळे आणि केसांचा रंग, राष्ट्रीयत्व इत्यादीप्रमाणे दोषीची ओळख असते. तर दुसऱ्या वॉन्टेड व्यक्तीच्या गुन्ह्यांशी संबंधित माहिती. या गुन्ह्यांमध्ये खून, बलात्कार, बाल शोषण किंवा सशस्त्र दरोडा यांचा समावेश असू शकतो.
इंटरपोल किती प्रकारच्या नोटीस जारी करते? : ब्लू नोटीस ही सूचना एखाद्या व्यक्तीची ओळख, त्याचे स्थान किंवा गुन्हेगारी प्रकरणे यासारखी विविध अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी वापरली जाते. ब्लॅक नोटीस ही अज्ञात बॉडीची ओळख पटविण्यासाठी जारी केली जाते. तर इंटरपोल दरवर्षी सुमारे 150 ब्लॅक नोटीस जारी करते. तसेच ग्रीन नोटिस ही एखाद्या व्यक्तीच्या गुन्हेगारी कृत्याबद्दलचे अलर्ट आणि गुप्तचरांशी संबंधित आहे, जिथे त्या व्यक्तीकडून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीविरोधात ही नोटीस बजावली जाते. ऑरेंज नोटीस ही सहसा या नोटीसमध्ये शस्त्रास्त्र किंवा व्यक्तीशी संबंधित माहितीसाठी इशारा दिला जातो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पर्पल नोटीसमध्ये गुन्हेगारांच्या गुन्ह्याच्या पद्धती आणि त्यांच्याकडे असलेली शस्त्रे यांची माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते.
हेही वाचा:Shraddha Murder Case आरोपपत्रासोबत जोडलेल्या ऑडिओ क्लिपच्या प्रसारणावर कोर्टाने घातली बंदी