महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, उप महापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड - मुंबई पालिकेचे उपमहापौर सुहार वाडकर

मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर, उपमहापौर पदावर सुहास वाडकर यांचीही बिनविरोध निवड झाली.

मुंबई महापौर निवडणूक

By

Published : Nov 22, 2019, 12:24 PM IST

Updated : Nov 22, 2019, 3:54 PM IST

मुंबई- जागतिक दर्जाची व श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर, उपमहापौर पदावर सुहास वाडकर यांचीही बिनविरोध निवड झाली. या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काम पाहिले. भाजप तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

मुंबई महापौर निवडणूक

दरम्यान, मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. भगवे फेटे घालून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. 'कौन चले भाई कौन चले, शिवसेना के वीर चले' तसेच 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरेंच्या जयघोषाने महापालिका दुमदुमली.

Last Updated : Nov 22, 2019, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details