महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीएपी घोटाळ्यात पवार कुटुंबीयांचा सहभाग; किरीट सोमैया यांचा गंभीर आरोप - Prataprao Pawar

BJP leader Kirit Somaiya : पीएपी ( PAP Scam) घोटाळ्यात किरीट सोमैया यांनी आज थेट शरद पवार (Shaad Pawar) आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. एका सदनिकेच्या मागे रुपये 40 लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार (Prataprao Pawar) यांची कंपनी आणि चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क कंपनीला मिळणार आहे, असं सोमैया म्हणाले.

BJP leader Kirit Somaiya
शरद पवार आणि किरीट सोमैया

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 5:52 PM IST

प्रतिक्रिया देताना किरीट सोमैया

मुंबई BJP leader Kirit Somaiya :मुंबईतील भांडूप येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात येणाऱ्या पीएपी घोटाळ्यात (PAP Scam) शरद पवार कुटुंबाचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमैया यांनी आज केलाय. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) आणि पर्यायाने इंडिया आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सुरू आहे.

घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी आता शरद पवार (Sharad Pawar) कुटुंबीयांचा घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील भांडूप येथील पीएपी घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांच्या कंपनीचा सहभाग असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलीय.



काय आहे सोमैया यांचा आरोप : मुंबईतील भांडूप येथील प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतील प्रकल्पात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. या घोटाळ्यात पवार कुटुंबीय सहभागी असल्याचा थेट आरोप सोमैया यांनी केलाय. भांडूप येथील 1903 सदनिकांचे कंत्राट चोरडिया विकासक यांना देण्यात आले होते. ज्या जमिनीवर या सदनिका बांधल्या जात आहेत, ती जमीन शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांच्या निओ स्टार इंडिया प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आहे. या सदनिका मुंबई महानगरपालिका बाजार भावाने 58 लाख रुपये प्रति सदनिका या दराने खरेदी करणार आहे. या सदनिका प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार आहेत. या सदनिकांच्या बांधकामांचा खर्च प्रत्यक्षात 15 ते 17 लाख रुपये इतका होणार आहे. म्हणजे एका सदनिकेच्या मागे सुमारे 40 लाख रुपयांचा फायदा प्रतापराव पवार यांची कंपनी निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि चोरडिया विकासक यांच्या न्यू वर्ल्ड लँडमार्क कंपनीला मिळणार आहे.



मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी :मुंबई महानगरपालिका ठाकरे सरकारच्या काळामध्ये दोन हजार कोटींच्या पीएपी घोटाळ्यात शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांचं नावही आता समाविष्ट करण्यात आलं आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं करणार असल्याचं सोमैया यांनी सांगितलं. त्यामुळं आगामी निवडणुकांपूर्वी शरद पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे का? याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हेही वाचा -

  1. खिचडी घोटाळ्यात ठाकरेंच्या मित्रांचा सहभाग, किरीट सोमैयांचा गंभीर आरोप
  2. Liquor And Land For Job Scam : भाजपने घोटाळ्यांना घेरले, विचारले- दिल्ली आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे काय झाले?
  3. Somayya Accuses BMC : कोविड घोटाळ्यात मुंबई महापालिकेची चौकशी करा, किरीट सोमय्या यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details