मुंबई :माजी मंत्री, शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँकवेटच्या नावाने शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. अनेक वर्ष सामान्य नागरिकांसाठी क्रीडांगण राखीव ठेवायचे होते. त्यावर मातोश्री क्लबच्या सुप्रीमो बँक्वेट नावाने रीतसर बँक्वेट हॉल असे उद्योग सुरू आहेत. आता मुंबई महापालिकेच्या आकत्यारीतील खुले क्रीडांगण, उद्यानासाठी असलेल्या जागेवर वारकऱ्यांनी अनधिकृत कब्जा करून दोन लाख चौरस फुटाच्या पंचतारांकित हॉटेल बांधकामाला सुरुवात केली आहे. या हॉटेलची किंमत 500 कोटी रुपये असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
महल पिक्चर्सकडून घेतला जागेचा ताबा :वायकर यांनी ही जागा महल पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच सध्याचे या जागेचे मालक अविनाश भोसले शाहीर बलवा, विनोद गोयंका यांच्याकडून ताबा घेतला आहे. या जमीनीचे मुल्या चार कोटी असतांना फक्त तीन लाखत खरेदी करण्यात आली आहे.
जमीन बळकवल्याचा आरोप : या जागे पैकी 67% जागा ही मुंबई महापालिकेच्या ताब्यात जनसामान्यांच्या आरक्षण असलेल्या क्रीडांगण आणि उद्यानासाठी घोषित करण्यात आली. मात्र, वायकर यांनी या जमिनीवर वीस वर्षांपासून कब्जा करून तिचा वापर लग्न समारंभासाठी केला. ही जागा कधीच महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली नाही. 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त चहल यांनी वायकर यांनी या जागेवर आपला कब्जा दाखवला. तिथे दोन लाख चौरस फुटाच्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाला मंजुरी मिळवली. वायकर यांनी लगेचच बांधकाम सुरू करून ज्या जमिनीवर त्यांचा अधिकार नाही ती जमीन बळकावली आहे.