मुंबई -कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तापासाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये ठिणगी पडली आहे. भाजपने ही संधी उचलून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे. 'उद्धवा अजब तुझे सरकार', असा मिश्किल टोला भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणी 22 डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटी(विशेष तपास पथक)ची मागणी केली होती. त्यानंतर 23 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर तपासासाठी दबाव आणला असल्याचे बोलले जात गेले. 24 जानेवारीला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक पत्रही लिहले. त्यानंतर 25 जानेवारीला या प्रकरणाचा तपास एनआयए(राष्ट्रीय तपास यंत्रणा)कडे देण्यात आला.