महाराष्ट्र

maharashtra

#CORONA : मुंबईत मृतांचा आकडा 1000 च्या पुढे, पालिकेच्या केईएम रुग्णालयातील शवगृह 'हाऊसफुल्ल'

By

Published : May 26, 2020, 11:07 AM IST

मुंबईच्या केईएम रुग्णालयात 27 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. त्याठिकाणी सध्या 37 मृतदेह असल्याने 10 मृतदेह शवागृहामधील मोकळ्या जागेत ठेवावे लागत आहेत. त्यातच शवागृहात काम करणाऱ्या सात कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे शवागृहात आता कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे.

केईएम रुग्णालयातील शवगृह 'हाऊसफुल्ल'
केईएम रुग्णालयातील शवगृह 'हाऊसफुल्ल'

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांचा आणि मृतांचा आकडा सतत वाढत आहे. यामुळे एकीकडे रुग्णालयांची क्षमता संपली असताना शवागृहांचीही क्षमता संपली असल्याचे समोर आले आहे. मुंबई पालिकेच्या केईम रुग्णालयातील शवागृहाची क्षमता संपल्याने कोरोनाचे मृतदेह शवागृहातील मोकळ्या जागेत ठेवावे लागत आहेत.

मुंबईत कोरोनाचे 31 हजार 789 रुग्ण असून कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे रोज 30 ते 40 मृत्यू होत आहेत. त्यातील बहुतेक मृत्यू हे रुग्णालयात उपचारादरम्यान होत आहेत. यामुळे रुग्णालयात असलेली शवागृहांची क्षमता संपली आहे. मुंबई महापालिकेची केईएम, नायर आणि सायन ही तीन महत्वाची रुग्णालये आहेत. त्यापैकी केईएम रुग्णालयात 27 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. त्याठिकाणी सध्या 37 मृतदेह असल्याने 10 मृतदेह शवागृहामधील मोकळ्या जागेत ठेवावे लागत आहेत. त्यातच शवागृहात काम करणाऱ्या सात कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे शवागृहात आता कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे.

केईएम रुग्णालय, मुंबई

मुंबई महापालिकेच्या सायन आणि केईएम रुग्णालयात कोरोनाच्या मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांसाठी वेगळी सोय करावी, असे आदेश सर्व रुग्णालयांना दिले होते. परंतु, पालिका प्रशासनाच्या आदेशानंतरही केईएम रुग्णालयात कोरोनाचे मृतदेह शवागृहाच्या मोकळ्या जागेत ठेवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान याबाबत पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले व केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details