महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उदय देशपांडे यांना जीवनगौरव कशासाठी? ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराचा सवाल

उदय देशपांडे यांना दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारावर ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराचा व्ही. व्ही. करमकर यांनी आक्षेप नोंदवला आहे.

उदय देशपांडे

By

Published : Feb 16, 2019, 8:11 PM IST

मुंबई - मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना रविवारी गेट वे ऑफ इंडियावर महाराष्ट्र शासनाकडून शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मात्र, एका ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराने आज एक लेख लिहीत या पुरस्काराबद्दल अस्वस्थता व्यक्त केली आहे. करमरकर यांनी उदय देशपांडे यांना दिला जाणार पुरस्कार हा फेरफार करून दिल्याचा आरोप केला आहे.

यावर उदय देशपांडे यांनी ईटीव्हीशी बोलताना, जर या पुरस्कारासाठी मी पात्र नसेल तर आरोप करणाऱ्यांनी ते शासनाला सांगावेत, शासन त्यावर उत्तर देईल, असे म्हणत करमरकर यांना गप्प केले आहे.

राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांची कर्तबगारी नेमकी कशाकशांत? महाराष्ट्र शासनाचे जीवनगौरव आदी छत्रपती पुरस्कार निश्चित करण्यासाठी, यशवंत खेळाडूंची खास निवड समिती त्यांनी बनविली. पण त्यांची निवड त्यांना रुचेना. पण पराभव मान्य करतील, तर ते विनोदजी कसले? त्यांनी माघार घेतली; लक्षात ठेवा, ‘यशस्वी’ माघार! या वाट चुकलेल्या निवड समितीस आणि हलक्या आवाजात त्यांनी विनम्र वृत्तीनं स्मरण करून दिलं की : समितीच्या निवडीत फेरबदल करण्याचा अधिकार शासनास असतो! मग विनोदजींनी आपणच नेमलेल्या निवड समितीची निवड गुंडाळली असेल, असे करमरकर यांनी म्हटले होते

यावर देशपांडे यांनी सांगितले, की कुठे ती २५ वर्षांपूर्वीची गोष्ट उगाच माथी मारता. मी त्यातून निर्दोष आहे. उगाच कोणला तरी विरोध करायचा म्हणून करू नये. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यातच माझे यश आहे. मी या दिलेल्या पुरस्कारावर इतका आंनदी नाही. मी केलेले काम हे जगात देशात बोलतच आहे. त्यामुळे ज्याला विरोध करायचा आहे, त्यांनी करावा, मी लक्ष देणार नाही. माझे काम आहे शिकवणे आहे आणि ते मी कायम करत राहिल, असे देशपांडे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details