मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि बीएमसीमधील वाद परत चर्चेत आला आहे. महापालिकेने कंगना रणौत यांच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईविरुद्धच्या याचिकेवर 27 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे.
कंगना रणौत कार्यालय तोडक कारवाई : मुंबई उच्च न्यायालय 27 नोव्हेंबरला देणार निकाल - कंगना रणौत याचिका मुंबई उच्च न्यायालय
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि बीएमसीमधील वाद परत चर्चेत आला आहे. महापालिकेने कंगना रणौत यांच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईविरुद्धच्या याचिकेवर 27 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे.
बीएमसीने 9 सप्टेंबर रोजी मुंबईतील कंगना रणौत यांच्या कार्यालयातील अनेक भाग बेकायदेशीर ठरवून तोडले होते. मालमत्तेतील काही बांधकाम बेकायदेशीरपणे बनवल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. महानगरपालिकेची कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी कंगना रणौत यांच्यातर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने रणौत यांना दिलासा देत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. आता याप्रकरणी २७ नोव्हेंबरला उच्च न्यायालय निकाल देणार आहे.
हेही वाचा -नरेडकोचा नवा प्रकल्प.. झिरो स्टॅम्प ड्युटीसह घ्या हक्काचे घर