महाराष्ट्र

maharashtra

पत्नीला भेटण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमधून जाळी तोडून आरोपीची धूम, 24 तासात पुन्हा अटक

By

Published : Apr 30, 2021, 7:29 PM IST

पोलिसांच्या तावडीतून निसटून गेलेल्या आरोपीला 24 तासाच्या आत पुन्हा अटक करण्यात आले आहे. आरोपीचे नाव करीम साबुल्ला खान आहे. क्वारंटाइन सेंटरमधून तो पत्नीला भेटण्यासाठी पळून गेला होता.

mumbai
मुंबई

मुंबई -पोलिसांच्या तावडीतून निसटून गेलेल्या आरोपीला 24 तासाच्या आत पुन्हा अटक करण्यात आले आहे. आरोपीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्वारंटाइन केले होते. तेथूनच त्याने धूम ठोकली होती.

पत्नीला भेटण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमधून जाळी तोडून आरोपीची धूम, 24 तासात पुन्हा अटक

पळून जाण्याचे चोराचे चॅलेंज

कांदिवली पोलिसांनी बांद्रा ते बोरिवली दरम्याच्या अनेक दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या एका आरोपीस पकडले होते. अटकेनंतर आरोपीचे मेडिकल चेकअप केले. तेव्हा तो आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले. त्यानंतर त्याला कांदिवली पश्चिम येथील साई नगर येथे क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवले होते. गंभीर म्हणजे त्याने क्वारंटाइन सेंटरमध्ये जाताना पळून जाण्याचे चॅलेंज केले होते.

संबंधित आरोपीला क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. मात्र, काल (29 एप्रिल) त्याने क्वारंटाइन सेंटरच्या खिडकीची जाळी तोडली आणि धूम ठोकली. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या चोरास ओशिवरा भागातून पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर आपल्या पत्नीला भेटायला पळून गेला होता. आरोपीचे नाव करीम साबुल्ला खान आहे. ज्याचे वय 24 वर्षे आहे. तो अनेक मेडिकलमध्ये जाऊन रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी करत होता.

देशभरात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. अनेकजण हे इंजेक्शन दुप्पट-तिप्पट किंमतीने घेत आहेत. ही संधी पाहूनच काहीजण रेमडेसिवीरचा काळाबाजार करत आहेत. जवळपास 12 ते 15 हजार रूपये देऊन लोक हे इंजेक्शन खरेदी करत असल्याचे समोर आले. तर आजवर अनेक रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -राज्यात रेमडेसिवीरची टंचाई : केंद्राकडून दिवसाला केवळ 28 हजार इंजेक्शनचा पुरवठा

हेही वाचा-71 लाखांची बोली लागलेल्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू, वर्षाकाठी द्यायचा 50 लाखांचे उत्पन्न

ABOUT THE AUTHOR

...view details