महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेत्री काजोलच्या आई तनुजा यांची प्रकृती खालावली, जुहू येथील रुग्णालयात उपचार सुरू - अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू

Veteran Actress Tanuja Hospitalised : बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री तनुजा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

kajol mother and veteran bollywood actress tanuja hospitalised in juhu mumbai
अभिनेत्री काजोलच्या आई तनुजा यांची प्रकृती खालावली, जुहू येथील रुग्णालयात दाखल; उपचार सुरू

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 7:54 AM IST

मुंबई Veteran Actress Tanuja Hospitalised :प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची आई आणि जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री तनुजा (वय 80) यांची प्रकृती खालावली आहे. तनुजा यांना रविवारी (17 डिसेंबर) सायंकाळी वयोमानाशी संबंधित समस्यांमुळं जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

उपचार सुरू :सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तनुजा यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. त्या औषधोपचारांना योग्य रितीनं प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीबाबत काळजी करण्यासारखं काही नाही. दरम्यान, लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी हिंदीसह बंगाली सिनेमातही काम केलंय. तनुजा या अभिनेत्री नूतन यांच्या बहीण असून बॉलिवूड अभिनेत्री काजोलच्या आई आहेत. काजोल आणि तनुजा यांच्यामधील आई-मुलीची बाँडिंग अनकेदा यापूर्वी समोर आली आहे.

16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण :तनुजा यांच्याविषयी अधिक सांगायचं झाले तर त्यांचा 23 सप्टेंबर 1943 मध्ये जन्म झाला. त्यांनी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. वयाच्या 16 व्या वर्षी 'छबीली' हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. हा सिनेमा 1960 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर 1962 मध्ये त्या 'मेमदीदी' चित्रपटात दिसल्या. तनुजा यांनी 'हाथी मेरे साथी','बहारें फिर भी आएंगी', 'तुनपुर का हीरो', 'दो चोर' आणि 'मेरे जीवन साथी' यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. दरम्यान, तनुजा यांच्या तब्येतीची माहिती समोर आल्यावर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तसंच त्या आजारपणातून बऱ्या होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा -

  1. रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ आणि काजोलनंतर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
  2. kajol devgan : काजोल तिची मुलगी न्यासा आणि मुलगा युगसोबत झाली मुंबई विमानतळावर स्पॉट
  3. Kuch Kuch Hota Hai Special Screening : 'कुछ कुछ होता है'ला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत आयोजित केले स्पेशल स्क्रीनिंग...

ABOUT THE AUTHOR

...view details