मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघाचा या टप्प्यात समावेश असून आज सकाळापासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा युवा मतदारांपेक्षा जास्त दिसून येत होता.
'ज्येष्ठ नागरिकांचा मतदानाचा उत्साह हा युवा मतदारांपेक्षा जास्त' - NORTH MUMBAI
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा युवा मतदारांपेक्षा जास्त दिसून येत होता.
'ज्येष्ठ नागरिकांचा मतदानाचा उत्साह हा युवा मतदारांपेक्षा जास्त'
जुहू येथील विद्यानिधी आणि रहेजा मतदार केंद्रामध्ये सकाळी सात वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. व्यवस्थित चालायला येत नसूनही तरीही व्हीलचेअर किंवा काठीच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत पोहोचून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच सर्वांनी मतदान करावे असा संदेश जावा, यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आवाहनही केले.