महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रेल्वेने तयार केलेल्या आयसोलेशन बेडचा रेल्वेमंत्र्यांनी शोध घ्यावा' - jitandra janvale

मुंबई रेल्वे सेंट्रल, माटुंगा-वर्कशॉप, लोअर परेल वर्कशॉपमध्ये कामगारांनी लॉकडाऊनच्या काळात सुट्टी न घेता दिवसरात्र मेहनत करून कोरोना रुग्णासाठी आयसोलेशन कोच तयार केले. ते कोच मुंबईसाठी वापरण्यात येत नाही. मग, ते गेले कुठे, असा जितेंद्र जानवले यांनी उपस्थित केला आहे.

जितेंद्र जानवले
जितेंद्र जानवले

By

Published : Jun 12, 2020, 2:52 PM IST

मुंबई- कोरोनाच्या संकटात भविष्यात रुग्णांना बेड उपलब्ध व्हावे, यासाठी लॉकडाऊन कालावधीत मुंबईतही रेल्वेने 460 आयसोलशन व 40 हजार बेड तयार केले. मात्र, हे बेड गेले कुठे? असा सवाल शिवसैनिक व उपविभागप्रमुख जितेंद्र जानवले यांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी रेल्वेने तयार केलेले बेड शोधून दाखवावे, असे आव्हान देखील जानवले यांनी केले आहे.

मुंबई रेल्वे सेंट्रल, माटुंगा-वर्कशॉप, लोअर परेल वर्कशॉपमध्ये कामगारांनी लॉकडाऊनच्या काळात सुट्टी न घेता दिवसरात्र मेहनत करून कोरोना रुग्णासाठी आयसोलेशन कोच तयार केले. ते कोच मुंबईसाठी वापरण्यात येत नाही. मग, ते गेले कुठे, असा जानवले यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई रेल्वे फायदा भारतीय रेल्वेला सर्वाधिक नफा मिळवून देते. मुंबई रेल्वेच्या उत्पन्नामुळे देशातील रेल्वेचा कारभार व इतर राज्यातील कामे चालतात. शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, मुंबईतील वर्कशॉपमध्ये मेल एक्सप्रेसमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले आयोसलेशन कोच कोणत्या राज्यात गायब झाले आहेत, याचा शोध रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घ्यावा आणि त्याचा शोध लावून ते माध्यमांसमोर मांडावे. तसेच या रेल्वे महाराष्ट्रातील रुग्णाच्या सेवेसाठी कधी उपलब्ध होणार, याची जनतेला विस्तृत माहिती द्यावी, अशी मागणी जानवले यांनी केली आहे.

बोलताना जितेंद्र जानवले

याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता बेड तयार असून राज्य सरकारने परवानगी दिल्यावर ते उपयोगात आणले जातील, असे सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details