मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आज दुपारी रेल्वेसह वाहतूक व्यवस्था बंद आणि सरकारी कार्यालयांना सात दिवसाच्या सुटीच्या बातमीने चांगलाच गोंधळ उडाला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन माफीनामा जाहीर केला.
माझ्या ट्विटरचा गैरवापर...आव्हाडांचा प्रसारमाध्यमांकडे खुलासा - कोरोना अपडेट बातमी
शंभूराजे ढवळे नावाच्या व्यक्तीने माझ्या ट्विटरचा गैरवापर करुन खोटे ट्विट केले. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, शंभूराजे ढवळे यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करतो, असे आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांकडे खुलासा केला.
हेही वाचा-महाराष्ट्रात 'कोरोना'चा पहिला बळी; ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पत्नी आणि मुलालाही लागण
शंभूराजे ढवळे नावाच्या व्यक्तीने माझ्या ट्विटरचा गैरवापर करुन खोटे ट्विट केले. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, शंभूराजे ढवळे यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करतो, असे आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांकडे खुलासा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात दिवसाच्या सुट्टीचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगून या वादावर पडदा टाकला. त्यानंतरच या संदर्भातील सर्व संदिग्धता दूर झाली.