मुंबई - झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घरे 10 वर्षाच्या आत विकत घेणाऱ्यांना घरातुन बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे. यावरून चांगलाच वाद रंगला आहे. अशा रहिवाशांना संरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता झोपूतील घराच्या खरेदी-विक्रीसाठी 10 वर्षांऐवजी 5 वर्षांची अट करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली आहे. त्यानुसार यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र 27 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय जाहीर झाला तर ही रहिवाशांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
झोपू योजनेतील घरांसाठी आता 5 वर्षांची अट, न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार-जितेंद्र आव्हाड - houses under slum redevelopment scheme
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घरे 10 वर्षाच्या आत विकत घेणाऱ्यांना घरातुन बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे. यावरून चांगलाच वाद रंगला आहे. अशा रहिवाशांना संरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता झोपूतील घराच्या खरेदी-विक्रीसाठी 10 वर्षांऐवजी 5 वर्षांची अट करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली आहे.
न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार-जितेंद्र आव्हाड