मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गेल्या आठवड्यात ठाण्यात पोलिसांनी 72 तासात दोन गुन्हे दाखल केले होते. हर हर महादेव चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण केल्या प्रकरणाचा एक गुन्हा दाखल केला. तर कळवा मुंब्रा बायपास रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्यांनी विनयभंगाचा दुसरा गुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केला होता. याबाबत जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. मात्र हे दोन्ही खोटे गुन्हे आपल्यावर दाखल करण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांना याचा त्रास होईल:मात्र हे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला होता. त्याबाबत आज ट्विट करून त्यांनी आपण दोन्ही खोट्यान गुन्ह्यांबाबत कोर्टात गेल्यास तपास पोलीस अधिकाऱ्यांना याचा त्रास होईल. त्यामुळे कोर्टात जावं किंवा नाही याबाबत विचार करत असल्याचे ट्विट केल आहे. तसेच आपल्यावर खोटे गुन्हे दाखल का झाले ? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असे त्यांनी आपल्या ट्विट मधून सांगितला आहे.
गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन: आपल्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले आहे. उद्या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन, तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात. म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हातवर करून मोकळे होऊन जातील. ह्याच्यात काय करावे हे सुचत नाही. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवा, किंवा वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी. अर्थात त्यांचा काय दोष आदेश कुठून आले हे महाराष्ट्राला माहीत आहे. असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून: 'हर हर महादेव' चित्रपटात दाखवण्यात आलेली दृश्य ही इतिहासाला धरून नाहीत. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा वेगळा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला गेला होता. आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बंद पाडला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांना मारहाण देखील झाली.
राष्ट्रवादी देखील आक्रमक: याबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर 72 तासाच्या आत जितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर राष्ट्रवादी देखील आक्रमक झाली होती. मुंबई शहर राज्यभरात अनेक ठिकाणी या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाला असला तरी, सातत्याने राजकीय दबाव पोटी 72 तासात आपल्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आला, असल्याचा आरोप जितेंद्र आवड यांच्याकडून करण्यात आला.