मुंबई - जागतिक बॅंकेने भारताचे विकसनशील देशाच्या यादीतले नाव रद्द केले आहे. त्यामुळे भारत आता कमी उत्पन्न गटात मोडला जाणार आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. पाकिस्तानचे नाव घेता-घेता आपण पाकिस्तानच्याच पंगतीत येऊन बसलो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याबद्दल मोदी-शाहंचे अभिनंदन, असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.
'भारत पाकिस्तानच्या पंगतीत गेल्यामुळे मोदी-शाहंचे अभिनंदन'
जागतीक बॅंकेने भारताचे विकसनशील देशाच्या यादीतले नाव रद्द केले आहे. त्यामुळे भारत आता कमी उत्पन्न गटात मोडला जाणार आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
एकेकाळी प्रमुख राष्ट्राबरोबर भारत तुलना करत होता. मात्र, आता आपण पाकिस्तानच्या मांडीला मांडी लावून बसलो. हे वेदनादायी असल्याचे आव्हाड म्हणाले. आपला देश पुढे गेला पाहिजे. आपल्या देशाने जागतिक स्पर्धेत अमेरिकेला मागे टाकले पाहिजे असे आव्हाड म्हणाले. राजकीय द्वेष, सत्ता मिळवण्याचा हव्यास यातून या गोष्टी घडत असल्याचे आव्हाड म्हणाले.
जागतिक बॅंकेने भारताचे विकसनशील देशाच्या यादीतले नाव कमी केल्याने भारत आता झांबिया, घाना, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांच्या पंगतीत गेला आहे. पाकिस्तानचे नाव घेता घेता आपण पाकिस्तानच्या पंगतीत गेल्याचे आव्हाड म्हणाले. या घटनेबद्दल मोदी - शाहंचे अभिनंदन असे म्हणत आव्हाड यांनी टोला लगावला.