पवारांच्या अंगावर हात टाकून भाजपने 'वाघाला' डिवचले, जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया - शरद पवार यांच्याविरोधी ईडीने गुन्हा दाखल केला
शरद पवारांच्या अंगावर हात टाकून भाजपने 'वाघाला' डिवचले असल्याची संतप्त राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
मुंबई - शिखर बँक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर समाजमाध्यमातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रक्रिया येत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पवारांच्या अंगावर हात घालून भाजपने वाघाला डिवचल्याचे आव्हाड म्हणाले. यासंदर्भात ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी साधला संवाद..