मुंबई - ४०-४० वर्ष सत्ता राबणाऱ्या मदमस्त प्रस्थापितांच्या ४ लाडक्या मुलांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला. आमची विचारधारा आणि स्वामीनिष्ठेला कोणीच विकत घेऊ शकत नाही. जे गेले ते गद्दार असेही आव्हाड म्हणाले.
मदमस्त प्रस्थापितांच्या ४ लाडक्या मुलांचा भाजपमध्ये प्रवेश - जितेंद्र आव्हाड - enters
४०-४० वर्ष सत्ता राबणाऱ्या मदमस्त प्रस्थापितांच्या ४ लाडक्या मुलांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला.
आज राष्ट्रवादीच्या ३ तर, काँग्रेसच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. या त्यांच्या पक्षांतरावरून जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. पण आम्हा सर्वांना गर्व आहे, की पक्षांतर करणाऱ्यांमध्ये एकही गरीबाचे पोर दिसले नाही. ती पोरे आजही शरद पवार साहेबांचा झेंडा हातात घेऊन धावताहेत आणि धावतील. आमची विचारधारा आणि स्वामीनिष्ठा याला कोणीच विकत घेऊ शकत नाही, असेही आव्हाड म्हणाले.
सातारा-जावळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अकोल्याचे आमदार वैभव पिचड, नवी मुंबईचे आमदार संदिप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, माजी मंत्री मधुकरराव पिचड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या त्यांच्या पक्षांतरावरून आव्हाड यांनी जोरदार निशाणा साधला.