महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयएएस अधिकारी निधी चौधरींनी तत्काळ सेवेतून बडतर्फ करा - जितेंद्र आव्हाड - IAS officer

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. निधी चौधरी यांनी एक ट्विट करून महात्मा गांधी यांचे खुनी गोडसे यांना धन्यवाद दिले आहेत.

निधी चौधरींनी तत्काळ सेवेतून बडतर्फ करा - जितेंद्र आव्हाड

By

Published : Jun 1, 2019, 7:27 PM IST

मुंबई -आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह असे ट्विट केले होते.

निधी चौधरी यांनी एक ट्विट करून महात्मा गांधी यांचे खुनी गोडसे यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच देशात आणि जगभरात महात्मा गांधीचे जिथे-जिथे पुतळे आहेत किंवा विविध ठिकाणी देण्यात आलेली त्यांची नावे काढण्यात यावी. भारतीय चलनावर असलेले त्यांचे चित्र काढण्यात यावे अशी मागणी करणारे ट्विट चौधरींनी केले होते. त्यावर आव्हाड यांनी जोरदार आक्षेप घेत अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना सरकारने तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

निधी चौधरींनी तत्काळ सेवेतून बडतर्फ करा - जितेंद्र आव्हाड

भारतीय सेवेत दाखल होत असताना महात्मा गांधी यांच्याबद्दल आदर राखणे अत्यावश्यक असतानासुद्धा चौधरी यांनी ट्विट करून त्यांचा अनादर केला आहे. त्यांच्यावर सरकारने विविध कलमातंर्गत कारवाई करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

निधी चौधरींनी केलेले ट्विट

दरम्यान, निधी चौधरी यांनी केलेले हे ट्विट जुने असून, आपण केलेले हे ट्विट काही दिवसांपूर्वीच डिलीट केले असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे. मात्र, अशाप्रकारचे दावा करणे हे खोटारडेपणा असल्याचे आव्हाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details