मुंबई - पावसाच्या अनियमितपणामुळे अजूनही महाराष्ट्रातील २४ जिल्हे कोरडेच आहेत. शेतकऱ्यांच्या पिकावर मरणकळा आली असून, एकही सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत योग्यरितीने पोहोचत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
सरकारची एकही योजना योग्यरितीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही - जयंत पाटील - farmer
पावसाच्या अनियमितपणामुळे अजूनही महाराष्ट्रातील २४ जिल्हे कोरडेच आहेत. शेतकऱ्यांच्या पिकावर मरणकळा आली असून, एकही सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत योग्यरितीने पोहोचत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
जयंत पाटील
महाराष्ट्रात आणखी हवा तेवढा पाऊस झालेला नाही. राज्यातील जवळपास २४ जिल्हे कोरडे आहेत. अनेक ठिकाणी कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सरकारने मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचे जयंत पाटील म्हणाले. निवडणुकीत व्यग्र झालेले सत्ताधारी पक्ष बळीराजाचे दु:ख कधी समजू शकतील का? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.