महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यावर एक नजर... - bulletein

हुतात्मा जवानांच्या शिष्यवृत्तीत बदल.. देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजारांचे अनुदान, नव्या मोदी सरकारचा मोठा निर्णय, मोदी सरकारच्या काळातच गेल्या ४५ वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी; कामगार मंत्रालयाच्या आकेडवारीतून खुलासा, राज्यासमोर भारनियमनाचे संकट.. कोयनेतून होणारी वीजनिर्मिती बंद, लग्नानंतर विघ्न; विवाह समारंभावरुन परतताना दोन पिकअप व्हॅनचा भीषण अपघात, २ ठार, ९ जखमी, शिवसेना नेते लिलाधर ढाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नेमणूक

मुंबई

By

Published : Jun 1, 2019, 12:02 AM IST

हुतात्मा जवानांच्या शिष्यवृत्तीत बदल.. देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजारांचे अनुदान, नव्या मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली - शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार २.० ची सुरुवात झाली आहे. आज मोदींनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिली कॅबिनेट बैठक बोलावली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्यण घेण्यात आले आहेत. वाचा सविस्तर...

राज्यासमोर भारनियमनाचे संकट.. कोयनेतून होणारी वीजनिर्मिती बंद

सातारा - कोयना धरणात केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प करण्याचे आदेश जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. पाणीसाठी कमी झाल्याने वीजनिर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.वाचा सविस्तर...

मोदी सरकारच्या काळातच गेल्या ४५ वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी; कामगार मंत्रालयाच्या आकेडवारीतून खुलासा

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण गेल्या ४५ वर्षात सर्वात अधिक होते. ही बाब मोदी सरकारने फेटाळून लावली होती. मात्र केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती सत्य असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे ६.१ टक्के होते. वाचा सविस्तर...

लग्नानंतर विघ्न; विवाह समारंभावरुन परतताना दोन पिकअप व्हॅनचा भीषण अपघात, २ ठार, ९ जखमी

लातुर - दोन पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शी- लातुर रोडवरील मुरुड अकोला जवळ दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. यातील एक पिकअपमध्ये लग्न समारंभ उरकून माघारी येणारे वऱ्हाड होते. वाचा सविस्तर...

शिवसेना नेते लिलाधर ढाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नेमणूक

मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर ढाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्यांदाच शिवसेनेच्या वाट्याला राज्यपाल पद आले आहे.वाचा सविस्तर...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details