मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये गुरुवारी आल्यानंतर विविध विकास कामांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मुंबईकरांना साद घालत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण मोदी यांचीच माणस आहोत असा उच्चार केला. मात्र त्यांचं हे वक्तव्य आता शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट यांच्या सुरू असलेल्या निवडणूक आयोगासमोरील संघर्षामध्ये वापरले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिंदेंना शिवसेना हवी कशाला- सिब्बलदरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपण पंतप्रधान मोदी यांचे असल्याचे सांगितल्याने ते भाजप पेक्षा वेगळे नाहीत त्यामुळे त्यांनी शिवसेनेवर दावा सांगण्याची गरज नाही असा युक्तिवाद शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे निवडणूक आयोगासमोर करणार आहेत. त्यामुळे शिंदे राजकीय भाषणाच्या आवेशात बोलून गेल्यानंतर त्यांना आता त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान देशाचे - लोढाया संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की पंतप्रधान हे देशाचे असतात त्यामुळे त्यांना कोणीही आपला माणूस म्हणू शकतो किंवा त्यांची सर्व माणसे आहेत असेही, म्हणता येईल त्यामुळे असे जर, कोणी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून युक्तिवाद करणार असेल तर ते योग्य नाही असा, युक्तिवाद टिकणारही नाही असा दावा लोढा यांनी केला आहे.