मुंबई- मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीत हा हक्क बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु पुण्यासारख्या शहरातील मतदान पाहून खंत वाटते. त्यामुळे मुंबईकरांनी भरभरून मतदान करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी फरोघ मुकादम यांनी केले आहे.
मुंबईकरांनी भरघोस मतदान करावे; उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
निवडणुकीच्या अगोदर २ दिवस सुट्टी आलेली आहे. तरी या दिवसात मुंबईकरांनी कुठे शहराबाहेर न जाता मतदानाच्या दिवशी भरघोस मतदान करावे. मतदानाच्या दिवशी आपल्याला मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
निवडणुकीच्या अगोदर २ दिवस सुट्टी आलेली आहे. तरी या दिवसात मुंबईकरांनी कुठे शहराबाहेर न जाता मतदानाच्या दिवशी भरघोस मतदान करावे. मतदानाच्या दिवशी आपल्याला मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुंबईची यावर्षीची टक्केवारी वाढेल याची आम्हाला खात्री आहे. कारण यावर्षी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या जास्त आहे. तसेच युवा मतदारांनी त्यांच्या कुटुंबाला मतदानासाठी आणणे ही त्यांची महत्वाची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे युवा मतदारांना आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास मुकादम यांनी यावेळी व्यक्त केला.