मुंबई :इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून गोंदियातील एका आरोपीने पुण्यामध्ये काही लोकांना राहण्यासाठी मदत केली. तो अब्दुल कादिर पठाण तसेच रत्नागिरी, ठाणे या ठिकाणाहून अनेक व्यक्तींची धरपकड राष्ट्रीय तपास संस्थेने केलेली आहे. त्या संदर्भात काही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी तर काहींना राष्ट्रीय तपास संस्थेची कोठडी सुनावलेली आहे. आज जुबेर नूर मोहम्मद शेख आणि जुल्फीकार या दोन आरोपींच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने केलेला दावा अमान्य करत त्यांना मुंबईच्या नगर दिवाणी व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एनआयए कोठडीची गरज नाही :आरोपींच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली की, अशा पद्धतीने धरपकड झाली की सर्व दस्तऐवज, कागदपत्रे जप्त केल्यानंतरही याच प्रकारच्या मागण्या केल्या जातात. NIAच्या या जुन्याच मागण्या आहेत. जसे की, आरोपींचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट NIA ने याआधीच जमा केले आहे. त्याचा डेटा रिकव्हर करण्यासाठी कोठडीची गरज नाही. आरोपींचे संगणक, लॅपटॉप आणि मोबाईल जो जप्त केलेला आहे, त्यामधून तो सहज सॉफ्टवेअर इंजिनियर रिकव्हर करून देऊ शकतो. तरी देखील राष्ट्रीय तपास संस्था कोठडी मागत आहे.
ही NIA ची दिशाभूल करणारी पद्धत :पुढे आरोपींच्या वकिलांनी पुन्हा मुद्दा मांडला की, आतापर्यंत NIA ने आरोपींची 18 दिवस कोठडी घेतली आहे. त्यांची ती कोठडी पुरेशी आहे. त्यामुळे आता आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळावी तसेच फॉरेन हॅन्डलर्स, कोड भाषा, शेल्टर आणि फंडिंग ही NIA ची दिशाभूल करणारी पद्धत दिसून येते. त्यामुळे आता राष्ट्रीय तपास संस्थेची कोठडी ही पुरेशी झाली. आता त्यांना न्यायालयीन कोठडीच मिळायला हवी, असा दावा न्यायालयासमोर केला गेला.
एनआयएच्या वकिलांचे मत :राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीने संदीप सदावर्ते या वकिलांनी बाजू मांडली की, आरोपींचा इसिसशी संबंध आहे. विदेशी निधीच्या आधारे यांच्या सर्व कारवाया सुरू आहेत; मात्र न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून राष्ट्रीय तपास संस्थेचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए लाहोटी यांनी 'एनआयए'चा दावा अमान्य केला व आरोपी नूर मोहम्मद आणि जुल्फीकार यांना न्यायालयीन कोठडी दिली.
हेही वाचा:
- Pune ISIS Module : पुण्यातील दहशतवाद्यांचे इसिसशी कनेक्शन, 'ही' संघटना कशी काम करते?
- Terror Activity in Pune : शांत, संयमी पुणे शहरात का रचले जाते देशविरोधी कृत्य?
- Terrorist Arrested: सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना पुण्यात अटक; गस्तीवरील दोन पोलिसांनी धाडसाने कशी कारवाई केली?