महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेन भारती नवे एटीएस प्रमुख.. राज्यातील १९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या - POLICE

राज्याच्या एटीएस पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहणारे अतुलचंद्र कुलकर्णी यांची बदली पुण्यात गुन्हे अन्वेषन विभागात करण्यात आली आहे.

राज्यातील १९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By

Published : May 15, 2019, 9:25 PM IST

Updated : May 15, 2019, 9:41 PM IST

मुंबई- राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकांना लक्षात घेऊन राज्यातील 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये 'कही खुशी कही गम' सारखे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई पोलीस खात्यात गेल्या 7 वर्षाहून अधिक काळ तळ ठोकून बसलेल्या आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पुन्हा लॉटरी लागली असून त्यांच्याकडे एटीएस प्रमुख पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

दुसरीकडे राज्याच्या एटीएस पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहणारे अतुलचंद्र कुलकर्णी यांची बदली पुण्यात गुन्हे अन्वेषन विभागात करण्यात आली आहे. सह पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांना पदोन्नती देत लाचलुचपत विभागात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून पाठवण्यात आले आहे. संजीव सिंघल यांना गुन्हे अन्वेषन विभाग पुणे येथून अप्पर पोलीस महासंचालक, प्रशासन मुंबई येथे पाठवण्यात आले आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या -

1) डॉ प्रज्ञा सरवदे यांना महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ येथे अपर पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक

2) सुनील रामानंद - अपर पोलीस महासंचालक, सुधार सेवा पुणे येथे नेमणूक

3) विनीत अग्रवाल - अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे नेमणूक

4) अनुप कुमार सिंह - अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथे नेमणूक

5) डॉ सुखविंदर सिंग - अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन मुंबई येथे नेमणूक

6) प्रताप दिघावकर - विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध येथे नेमणूक

Last Updated : May 15, 2019, 9:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details