मुंबई iPhone 15 launch in Mumbai : सध्या आयफोनची क्रेझ असून आयफोन 15 ही सिरीज आज लॉन्च झाली आहे. iPhone 15 सीरिजची आजपासून भारतासह जगभरात विक्री सुरू झाली आहे. चारही आयफोन मॉडेल यूएसबी सी आणि डायनॅमिक आयलंडसह खरेदी करता येतील. परंतु iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max जास्त दमदार वाटत आहेत. कारण ह्यात प्रो चिप, टायटेनियम बॉडी आणि जास्त झूम क्षमता आहे. आयफोन 15 हा लॉन्च झालेला नवा मोबाईल खरेदी करण्यासाठी बीकेसी येथील ॲपलच्या शोरूम बाहेर ग्राहकांची झुंबड उडालेली दिसत आहे. नाशिक, पुणे, अहमदाबाद येथून अनेक ग्राहक आयफोनच्या खरेदीसाठी आलेले आहेत.
डायनॅमिक आयलँड फीचर -IPhone 15 आणि 15 Plus मध्ये 48 MP कॅमेरा आला आहे. आधी 12 MP होता. डायनॅमिक आयलँड फीचर नवीन आहे. लाईटनिंग पोर्टच्या जागी UCB C टाईप पोर्ट आला आहे. त्यामुळे आता आयफोन 15 हा फोन सी टाईपच्या चार्जरनेच चार्ज करता येणार आहे. याआधीच्या मोबाईलला आयफोनचाच चार्जर आयफोन चार्ज करण्यासाठी गरजेचा होता. मात्र आज लॉन्च झालेल्या आयफोन 15 या मोबाईलसाठी कुठलाही सी टाईप चार्जर देखील उपयोगी पडू शकणार आहे. त्यामुळे जर तुमच्या आयफोन 15 ची बॅटरी डिस्चार्ज झाली. तर सोयीस्करपणे उपलब्ध असलेल्या सी टाईप चार्जरने तुम्ही तुमचा आयफोन चार्ज करू शकणार आहात. या मोबाईलचा प्रोसेसर नवीन आहे.