महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

International Womens Day 2023 : पोलीस दलातही सुरूवातीला करावा लागला संघर्ष , वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाईंचा प्रवास - एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या महिला इन्चार्ज

सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असलेले मुंबई पोलीस दल. या मुंबई दलात आपला ठसा उमटवणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आहेत ज्योती देसाई त्यांच्याशी आपण खास जागतिक महिला दिनानिमित्त बातचित केली आहे. मुंबईच्या दक्षिण भागात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशन आहेत. या पोलीस स्टेशनमध्ये याआधी कोणी महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नव्हत्या. पहिल्यांदाच ज्योती देसाई या महिला इन्चार्ज या पोलीस ठाण्याला लाभलेल्या आहेत.

International Womans Day 2023
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई

By

Published : Mar 8, 2023, 9:18 AM IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई

मुंबई :दक्षिण मुंबईतील एल टी मार्ग पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रथमच महिला अधिकारी धुरा सांभाळत आहे. जागतिक महिल दिनाच्या औचित्य साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी खास बातचीत केलीये. त्यांना पोलीस दलात आलेले चांगेल वाईट अनुभव पाहूयात..



पुरुषांची मक्तेदारी खोडली :तुम्ही पुरुषांची मक्तेदारी असलेले पोलीस दल आहे त्यामध्ये तुम्ही कसं भरती झालात, कुठून प्रेरणा मिळाली, तुमचे स्वप्न होतं का? या प्रश्नाला उत्तर देताना ज्योती देसाई म्हणाल्या, 1992 मध्ये एमपीएससीद्वारे मी पोलीस खात्यामध्ये प्रवेश केला. आज तीस वर्षे पूर्ण झालेली आहे. 31वे वर्ष चालू आहे. माझ्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड जर बघितला. तर माझे वडील आणि आई हे दोघेही शिक्षण क्षेत्रात आहेत. आम्ही पाच बहिणी आहोत. एक भाऊ आहे. माझ्या चार बहिणी आहेत त्या शिक्षण क्षेत्रात आहेत आणि भाऊ जो आहे तो आयआयटी एमटेक आहे. मी लहानपणापासून खेळामध्ये होते आणि मग खेळत असताना त्याचा उपयोग आपण करून घेऊ त्यामुळे फिजिकली फिट होते आणि म्हणून मी पोलीस खात्यात आले.

पोलीस खात्यात आल्यानंतर संघर्ष :पोलीस खात्यात आल्यानंतर 1992 त्यावेळेला थोडी परिस्थिती आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. अगदी युनिफॉर्म शर्ट आम्ही घालतो आहोत तिथून आमचा संघर्ष सुरू झाला. आम्हाला विमानतळावर सुरक्षा विभागांमध्ये पोस्टिंग दिली गेली आणि त्या ठिकाणी आम्ही ट्रेनिंगवरून आल्यानंतर आम्हाला तिथे पॅन्ट शर्ट दिला होता. तो वापरायला लागलो आणि मग त्यावेळेला महिला पोलिसांनी साडी नेसावी की पॅन्ट शर्ट घालावी इथून सुरुवात झाली आणि मग त्यावेळेसचे जे माननीय पोलीस आयुक्त होते सांम्रा सर त्यांच्याकडे आम्ही गेला. मग आम्ही पॅन्ट शर्ट वापरायला लागलो. म्हणजे संघर्षाची सुरुवात ही आमची तेव्हापासूनची आहे. त्यानंतर मग आम्हाला विविध पोस्टिंग देण्यात आल्या.


पोलीस दलात संघर्ष : पुढे ज्योती देसाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, मुंबई पोलीस दलात मी माझे बरेच योगदान दिले आहे. मुंबईमध्ये बांद्रा पोलीस स्टेशनला मी काम केले आहे. नार्कोटिक्स, क्राईम ब्रँचला मी काम केले आहे. त्यानंतर पोलीस ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी मी पोलीस कॉन्स्टेबलला शिकवण्यासाठी आठ वर्ष माझ तिथे योगदान दिले. त्याच्यानंतर मानवी हक्क आयोगासारखा महाराष्ट्र शासनाचा जो आयोग आहे, त्या ठिकाणी इन्वेस्टीगेशन विंगला मी काम केले. हे काम करत असताना खूप सारा अनुभव माझ्या गाठीशी आला आणि तिथून जेव्हा पुन्हा मुंबई पोलीस दलात माझी बदली झाली. त्यावेळेला मला आरे पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली. आरे पोलीस स्टेशन तसा बऱ्यापैकी जंगल एरिया आहे. त्या ठिकाणी देखील तिथे थोडा कमी स्टाफ. पण आम्ही बऱ्यापैकी तिथे काम केले आणि त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सरांनी मला एलटी मार्ग पोलीस स्टेशनला पोस्टिंग दिली. पहिल्यांदा महिला अधिकाऱ्याला हे पोस्टिंग दिले.

पोलीस दलातआव्हाने : त्यामुळे ते सरांनी ज्या विश्वासाने मला ते सोपवलेली आहे. ती जबाबदारी पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणाने मी एलटी मार्गसारख्या पोलीस स्टेशनमध्ये आज काम करत आहे. मला असे वाटते महिलांनी दोन्ही सांभाळायला हवे. घर पण आणि काम पण. त्यामुळे महिला कधीच विक नसते ती स्ट्रॉंगच असते. कारण ती घरचं बघत असताना तेवढ्याच शक्तीने नोकरी सांभाळत असते. त्यामुळे जे महिलांना अबला म्हणतात ते मला आवडत नाही. महिला अबला नाहीत, आम्ही खूप स्ट्रॉंग आहे. आता तुम्ही महिला म्हणून किती पोलीस दलात काम करताना किती आव्हाने येतात यावर ज्योती देसाई यांनी सांगितले की, इथे काम करताना खूप आव्हाने आहेत.

फसवणूकीच्या घटना : लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये जर आपण पाहिले तर या ठिकाणी व्यापारी वर्ग जो आहे, तो जास्त आहे. इथे 80% व्यापारी वर्ग आहेत आणि 20 टक्के रेसिडन्स एरिया आहे. या ठिकाणी सोन्याचं मार्केट आहे. इलेक्ट्रिक मार्केट आहे, कपडा मार्केट आहे. त्यामुळे जागतिक लेवलवरून येणारे जे काही कस्टमर असतात. या बाजारपेठेत येत असतात आणि इथं आल्यानंतर त्यांना सुरक्षा मिळणे हे पोलिसांचे पहिले कर्तव्य आहे. त्यांच्याबरोबर या ठिकाणी समजा व्यवहाराच्या दृष्टिकोनातून काही अपहार घडला किंवा काही अशा पद्धतीची फसवणूक घडली. तर त्या पद्धतीचे जास्त गुन्हे या पोलीस स्टेशनला तपासासाठी असतात. परंतु माझ्याकडे काम करणारे जे अधिकारी आहेत. ते खूप सक्षम आहेत आणि माझ्याकडे चार डिटेक्शन ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मदतीने गेल्या एक वर्षांमध्ये आम्ही एक 17 किलो चोरीला गेलेले सोने परत मिळवले होतो. ते मला वाटते की आम्ही आठ ते दहा दिवसात आम्ही संपूर्ण सोने परत आणलेले आहे. गेल्याच महिन्यात दरोडा पडला होता. त्याच्यामध्ये चार करोडची मालमत्ता होती. पण ती सुद्धा आम्ही चार दिवसाच्या आत 11 आरोपींना अटक करून ती मालमत्ता मी पूर्ण आणली.


महिलांचा विश्वास वाढला पाहिजे :तुमच्याकडे महिला सक्षमीकरणावर बोलायचं झालं तर तुम्ही त्यांना महिलांना काय सल्ला द्याल आणि एका महिलेवर ऍसिड हल्ला झाला होता यावर ज्योती देसाई म्हणाल्या, पहिल्यांदा महिला पोलीस ठाण्यात यायला घाबरत होत्या. पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये माझ्या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पोलीस कॉन्स्टेबल्स, अंमलदारांना ट्रेनिंग दिले गेले तिथे माझी प्रायोरिटी होती की, महिलांनी विश्वासाने तुमच्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आले पाहिजे आणि तुम्ही तो विश्वास दिला पाहिजे. जर आपण तो दिला तर नक्कीच ती महिला निर्भयपणे पोलीस स्टेशनला येणार आहे. तर माझ्या कालावधीमध्ये किमान आठ ते नऊ बॅचला मी ट्रेनिंग दिले. त्यातील दोन ते तीन हजार विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ते म्हणतात की, मॅडम आमच्याकडे जेव्हा महिला येतात तेव्हा त्यांना माझी आठवण येते. आम्ही त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो. त्यांची बाजू ऐकण्याचा प्रयत्न करतो.

ऍसिड हल्ला :आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला सकाळी पाणी भरण्यासाठी उठली होती तेव्हा तिच्यावर ऍसिड हल्ला झाला. ती जी महिला आहे ती लिविंग रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्तीसोबत राहत होती तोच आरोपी आहे. आरोपी दारू पीत होता, व्यसनी होता, तो तिला त्रास देत होता, पैसे मागत होता. पहाटेच्या वेळेला पाणी भरत असताना तिच्यावर ऍसिड हल्ला झाला. अगदी पाच ते दहा मिनिटात आमचे पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी आरोपीला पकडले. तपास करत असताना आम्ही टार्गेटच असे ठेवलेले होते की, या मधल्या आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण तपास केला. माझे सर्व पोलीस अधिकाऱ्यांना असे सांगणे आहे की, जेव्हा गुन्हे दाखल करतो त्याच वेळेला तपास अत्यंत उत्कृष्टपणे जर केला. तर नक्कीच आपण आरोपीला शिक्षा देवू शकतो. कायद्याचा धाक निर्माण करणे हे पोलिसांचे काम आहे.

महिलांना समजून घेणे गरजेचे :सर्व अधिकाऱ्यांना सांगते की, माझ्या पोलीस स्टेशनमध्ये येणारी जी महिला आहे. तिचे म्हणणे तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या, तिची काय अपेक्षा आहे. पोलिसांनी तिला समजून घ्या, मगच आपण त्याचे निराकरण करू शकता. माझ्या पोलीसमध्ये येणारी जी महिला आहे. ती महिला निर्भयपणे येते. तिचे निराकरण करतो. असेच मी सगळ्यांना अपील करीन की, प्रत्येकाने येणाऱ्या महिलेचे ऐकून घ्या, तिची समस्या काय आहे जाणून घ्या. नक्की ती तिथे सावरते आणि मग तो लढा द्यायला ती तयार होते.


हेही वाचा :International Womans Day 2023: महिला, आरोग्य हा कळीचा मुद्दा; महिलाच्या आरोग्यावर देशाचे आरोग्य अवलंबून

ABOUT THE AUTHOR

...view details