महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुढील चार तासात मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता...

नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल पश्चिम मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात, पूर्व मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात, पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात कायम आहे. शनिवारी सकाळी नोंदविले गेलेले २४ तासांतील पर्जन्यमान पाहता कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

intense-spell-of-rain-with-possibility-of-thunder-likely-in-marathwada
पुढील चार तासात मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता...

By

Published : Jun 21, 2020, 12:02 AM IST

Updated : Jun 21, 2020, 1:44 AM IST

मुंबई-पुढील चार तासात अहमदनगरसह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह तीव्र पाऊस पडेल, अशी माहिती कुलाबा प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

दरम्यान, नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल पश्चिम मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात, पूर्व मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात, पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात कायम आहे. शनिवारी सकाळी नोंदविले गेलेले २४ तासांतील पर्जन्यमान पाहता कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये)...
कोकण आणि गोवा: गुहागर १५, कानकोन, मोखेडा प्रत्येकी ४, दोडामार्ग, कुडाळ, माथेरान, पेडणे, केपे, रत्नागिरी, सांगे, सावंतवाडी, वैभववाडी, वालपोई, वेंगुर्ला प्रत्येकी ३, चिपळूण, दाभोलीम (गोवा), म्हापसा, राजापूर, संगमेश्वर देवरूख प्रत्येकी २, बेलापूर (ठाणे), दापोली, हर्णे, लांजा, मालवण, मडगाव, पालघर, रामेश्वर कृषी, विक्रमगड, वाडा प्रत्येकी १.

मध्य महाराष्ट्र: गगनबावडा ५, राधानगरी ४, पन्हाळा, शाहूवाडी प्रत्येकी ३, आजरा, चांदगड, सांगली प्रत्येकी २, गारगोटी, गिरना, कागल, मिरज, तासगाव, वेल्हे प्रत्येकी १.

मराठवाडा: अंबेजोगाई ६, औरंगाबाद, मंथा प्रत्येकी ५, हदगाव ४, कळमनुरी, सेलू प्रत्येकी ३, घनसावंगी, हिमायतनगर, हिंगोली, सेनगाव प्रत्येकी २, औंधा नागनाथ, माजल गाव, परतूर १ प्रत्येकी.

विदर्भ: धारणी ५, खारंघा 3, आष्टी, चिखलदरा, काटोल, नारखेडा, वरुड २ प्रत्येकी, आर्वी, बाभुळगाव, चांदूर, धामणगाव, मोर्शी प्रत्येकी १.

घाटमाथा: वळवण ३, खोपोली, कोयना (पोफळी), शिरगाव, लोणावळा (ऑफिस), लोणावळा (टाटा), शिरोटा, दावडी, खंद, ताम्हिणी प्रत्येकी १.

पुढील हवामानाचा अंदाज:
२१ जून: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
२२ जून: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
२३-२४ जून: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:
२१ जून: कोंकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
२२-२३ जून: कोंकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

Last Updated : Jun 21, 2020, 1:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details