महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Loan App Defrauded : इन्स्टंट लोन अ‍ॅपचा गंडा; 50 हजाराच्या कर्जावर उकळले 4.15 लाख रुपये - चुनाभट्टी पोलिस

ऑनलाईन इन्स्टंट लोन अ‍ॅपने 50 हजाराच्या कर्जावर साडेचार लाख रुपये उकळवल्याची (Instant loan app defrauded ) तक्रार दाखल झाली आहे. पत्नीच्या उपचाराकरिता तक्रारदाराने कर्ज घेतले. मात्र खात्यामध्ये पाच हजारच आले होते कंपनीकडून तक्रारदार आकडू 4.15 लाख रुपये उकळले (defrauded Rs 4.15 lakh on a loan of Rs 50,000) असल्याची तक्रार चुनाभट्टी पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली आहे.

Defrauded
फसवले

By

Published : Jun 4, 2022, 7:47 PM IST

मुंबई:मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे मॉर्फ केलेले फोटो मित्रमंडळींना शेअर करण्याबरोबर, धमकी, शिवीगाळचे तब्बल 250 कॉल करुन 4.15 लाख रुपये लुटल्याचा (defrauded Rs 4.15 lakh on a loan of Rs 50,000) प्रकार चुनाभट्टी परिसरात समोर आला आहे. वसुलीमुळे कर्जबाजारी झाल्याने तरुणाने चुनाभट्टी पोलिसांकडे (Chunabhatti Police) धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीसह बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


चुनाभट्टी परिसरात राहणारा तक्रारदार एका नामांकित हॉटेलमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी करुन मित्रांसोबत राहतो. त्याचे कुटुंबीय नागपूर येथे राहते. पत्नीची प्रकृती बिघडल्याने त्यांनी मित्रांकडून पैशांची मागणी केली. मात्र पैशांची व्यवस्था न झाल्याने त्यांनी 28 मार्च रोजी कॅश बस नावाचे लोन अ‍ॅप डाउनलोड केले. त्यात सर्व तपशील भरून 50 हजार रुपयांच्या कर्जाची आवश्यकता असल्याबाबत नमूद केले. कर्ज मंजूर होणार असल्याबाबत संदेश मोबाईलवर आला. संदेशावर क्लिक करताच खात्यात 50 हजारऐवजी 5 हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले.

त्यापाठोपाठ 7 दिवसांच्या आत 8 हजार 200 रुपये परत करण्याबाबत वेगवेगळ्या लिंक मोबाईलवर येण्यास सुरुवात झाली. त्यानुसार 2 एप्रिल रोजी त्यांनी 8 हजार 200 रुपये ट्रान्सफर केले. मात्र पैसे देऊन देखील वाढीव पैशांसाठी तगादा सुरु झाला. फोटो मॉर्फ करून ते मित्रमंडळींना पाठवून बदनामीची धमकी, शिवीगाळ सुरू झाली. त्यांनी दुर्लक्ष करताच त्यांचे मॉर्फ केलेले फोटो, व्हिडीओ त्यांना वेगवेगळ्या क्रमांकावरून पाठवण्यास सुरुवात झाली. संबंधित क्रमांक ब्लॉक करताच अन्य क्रमांकावरून शिवीगाळ धमकीचा कॉल येत होता. असे तक्रारी म्हटले आहे.



सध्या मुंबईमध्ये ऑनलाईन इन्स्टंट लोन अ‍ॅपचा माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर येत आहे यासंदर्भात आतापर्यंत मुंबईतील विविध पोलीस स्टेशन मध्ये 25 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास सायबर तिने संबंधित पोलिस विभागाकडे वर्ग केला आहेत.

हेही वाचा :हैदराबाद - आजोबांच्या मोबाईलवर फ्री फायर गेम खेळून उडवले ३६ लाख रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details