महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हावडा एक्सप्रेसच्या शौचालयात सापडले मृत अर्भक - अर्भक

साफसफाईसाठी थांबलेल्या हावडा एक्सप्रेसच्या शौचालयातील कचऱ्याच्या डब्यात ६ महिन्याचे मृत अर्भक सापडल्याची घटना आज(बुधवार) लोकमान्य टिळक टर्मिनस येथे घडली. याबाबत टिळकनगर पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डात थांबलेल्या एक्सप्रेसच्या शौचालयांमध्ये सापडले अर्भक
लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डात थांबलेल्या एक्सप्रेसच्या शौचालयांमध्ये सापडले अर्भक

By

Published : Jan 22, 2020, 11:38 PM IST

मुंबई - साफसफाईसाठी थांबलेल्या हावडा एक्सप्रेसमध्ये ६ महिन्याचे मृत अर्भक सापडल्याची घटना आज(बुधवार) लोकमान्य टिळक टर्मिनस येथे घडली. याबाबत टिळकनगर पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

हावडा येथून मुंबईतील कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी सातच्या सुमारास ही गाडी आल्यानंतर सफाईसाठी तिला यार्डात नेण्यात आले. यावेळी सफाई करत असताना कर्मचाऱ्यांना एसी डब्याच्या शौचालयालयातील कचरा डब्यात हे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना कळवताच, आरपीएफ, रेल्वे पोलीस आणि टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर टिळकनगर पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेऊन ते राजावाडी रुग्णालयात पाठवले असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details