मुंबई- मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रीय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली होती. तसेच एका अनेक चॅनल्स असलेल्या समुहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना समजली. त्यांनी तत्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांचेशी संपर्क साधून या सर्व माध्यमातील लोकांची चाचणी करावी असे निर्देश दिले.
प्रसार माध्यमातील सक्रीय पत्रकारांची कोरोना चाचणी करा - उद्योगमंत्री
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबई महापालिका, माहिती व जनसंपर्क, महासंचालकांना सर्व माध्यम प्रतिनिधींची कोरोना चाचणी करण्याबाबतच्या सुचना दिल्या.
वृत्तवाहिन्यांचे सर्वच प्रतिनिधी दिवसरात्र बातम्या प्रसारणाचे काम करत आहेत. त्यांचे हे काम जोखमीचे असून त्यांनी आपले स्वास्थ सांभाळून काम करावे तसेच त्यांच्या सर्वत्र फिरण्यावर बंधने असावीत जेणेकरुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल. यासाठी शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांची चाचणी करण्यासाठी देसाई यांनी महासंचालक, माहिती व जनसंपर्क यांनाही सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा -'गुगल'ने 'डुडल'द्वारे मानले आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार