मुंबई :उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. चालू वर्षात अदानी यांनी शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. मात्र कालची पवार अदानी यांच्या भेटीच्या टायमिंगवरून चर्चा सुरु झालाय. भेट भविष्यातील काही मोठ्या घडामोडीची चाहूल आल्याचे बोलले जात आहे.
२० हजार कोटी रुपये अदणी यांचा कंपनीत आले कुठून :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे कि, अदानी यांनी कोणाला भेटावे हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. अदानी, काँग्रेसची वयैक्तिक दुश्मिनी नाही. परंतु आमचे नेते राहुलजी गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे आहेत.
मोदी-अदानी यांचा संबंध काय? २० हजार कोटी रुपये अदनी यांचा कंपनीत आले कुठून? सर्व कंपन्या अदानीलाच काय विकल्या जात आहेत? काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम असून अदानी घोटाळ्याची चौकशी जैपीसी कडूनच व्हावी.आमची मागणी मोदी सरकार का पूर्ण करत नाही. देशातील जनतेचा पैसा असल्याने आम्ही प्रश्न विचाणारच, कोणाला व्यक्तिगत जपायचे असेल तो त्यांचा प्रश्न - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
अदानी भेटी विषयी शरद पवार यांनी दिली माहिती :गुरुवारी रात्री उशिरा अदानी यांनी आपली भेट घेण्याचे कारण म्हणजे सिंगापूर मधील एका शिष्टमंडळ माझ्याकडे आले होते त्यांना उद्योगपती अदानी यांची भेट घ्यायची होती. त्यांना काही तातंत्रिक विषयावर अदानी सोबत चर्चा करायची होती.त्यासंदर्भात त्यांनी एकमेकांशी भेट देखील झाली आहे.आमच्यात तांत्रिक बाबींवर चर्चा झाली.मात्र त्यांच्या दोघांतील भेटीबाबत मला जास्त माहिती नाही.
शरद पवार अदानी मागे :अमेरिकेतील हिंडनबर्ग ह्या संस्थेने काही दिवसापूर्वी गौतम अदानी यांच्या समूहाबद्दल एक रिपोर्ट प्रसारित केला होता. त्यात मार्केट मधील हेराफेरी तसेच खात्यांमध्ये फसवणूक केल्याबद्दलचा ठपका ठेवला होता. त्यानंतर अदानी ग्रुप शेअर्स गडगडले होते. अकाउंटमध्ये फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. अदानी प्रकारणावरून मोदी सरकारला काँग्रेसने धारेवर धरले होते. गौतम अदानी यांनी हे आरोप सर्व आरोप फेटाले होते. विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणात जैपीसीची मागणी केली होती. मात्र शरद पवार यांनी जेसीपी गरज नसल्याचे म्हटले होते. त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने नेमलेली समिती अधिकच प्रभावी होईल तसेच हिंडेनबर्ग हि परदेशातील असून त्यांच्या अहवालाला का महत्व द्यायचं असे पवार म्हणाले होते.
पवार अदानी दुसऱ्यांदा भेट :देशातील अनेक राजकीय नेते शरद पवार यांच्याकडून राजकीय सल्ले घेत असतात. प्रशासन, राजकारणातील प्रदीर्घ अनुभव यामुळे उद्योगपती देखील पवार यांना भेटत असतात. गौतम अदानी यांनी शरद पवार यांची या वर्षातील घेतलेली दुसऱ्यांदा भेट हि नेमकि देशहितासाठी कि उद्योगहितासाठी हे येणारा काळचं ठरवेल.
हेही वाचा -Sharad Pawar Met CM Shinde : शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; भेटीमागचे 'हे' आहे कारण