मुंबई:भारतीय नौदलाचे प्रगत हलके हेलिकॉप्टर (ALH) मुंबईहून नियमित उड्डाण करत असताना किनार्याजवळ कोसळले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शोध आणि बचाव मोहिमेद्वारे त्वरित शोध सुरू करण्यात आला आणि नौदलाच्या गस्ती पथकाद्वारे तीन सदस्यांच्या क्रूची सुरक्षित सुटका केली आहे. अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, अपघाताचे कारण स्पष्ट झाले नाही आणि भारतीय नौदलाने चौकशीचे आदेश दिले असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
दुसऱ्या एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भारतीय नौदलाचे प्रगत हलके हेलिकॉप्टर (एएलएच) तीन कर्मचार्यांसह नियमित उड्डाणासाठी बुधवारी मुंबई किनारपट्टीवर पाण्यात आपत्कालीन लँडिंग केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नौदलाच्या गस्ती पथकाने क्रूची सुटका केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय नौदलाचे ALHची मुंबईत नियमित उड्डाणादरम्यान किनार्याजवळ आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. तात्काळ शोध आणि बचावामुळे नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे 3 जणांच्या क्रूना सुरक्षित वाचवण्यात यश आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. डिचिंग म्हणजे पाण्यावर आपत्कालीन लँडिंग होय. त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत या हेलिकॉप्टरला पाण्यावरच लँड करण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.