मुंबई: अकरावी आणि बारावीच्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या 33व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या 4 भारतीय विद्यार्थ्यांनी चार पदकांची कमाई करत शानदार कामगिरी ( India won five medals in the IBO ) केली आहे. यामध्ये बंगळुरु येथील मयांक पंढरी याने सुवर्ण पदक ( Mayank Pandhari won gold medal ) तर, दिल्लीचा अमृतांश निगम, प्राची जिंदल आणि रोहित पांडा मध्य प्रदेश या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले आहे. याबाबत भारतात परतलेला विद्यार्थी रोहित पांडा ( Rohit Panda won silver medal ) याच्याकडून स्पर्धेबद्दलच्या त्याच्या भावना जाणून घेतल्या. तसेच मयांक पंढरी यानी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
ह्या स्पर्धेबाबत होमीभाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ( HCSETIFR ) ह्या शैक्षणिक उपक्रमाच्या समन्वयक रेखा वर्तक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, आर्मेनिया देशात भारतीय विद्यार्थ्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं. दरवर्षी सुमारे 30,000 विद्यार्थी अशा स्पर्धेसाठी नाव नोंदणी करतात. ही नाव नोंदणी विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांच्या संस्था करतात. त्यात सैद्धांतिक संकल्पनात्म परीक्षा घेतली जाते. त्यातून 350 विद्यार्थ्यांना निवडलं जाते. ही निवड होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र करते.