महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तो दिवस दूर नाही ज्यादिवशी आपण चंद्रावर मानव पाठवू - शास्त्रज्ञ जतीन राठोड - isro

इस्रोतर्फे आज चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 'भारतासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. आपल्या युवा पिढीला भविष्यात खूप काही शिकायला मिळणार आहे. भारत नक्कीच चंद्रावर रोव्हर उतरवणारा चौथा देश बनेल.' अशी आशा  शास्त्रज्ञ जतीन राठोड यांनी व्यक्त केले. भारत मानवला चंद्रावर पाठवेल तो दिवस दूर नाही असेही राठोड म्हणाले.

चंद्रावर माणूस पाठवण्याचा दिवस दूर नाही - शास्त्रज्ञ जतीन राठोड

By

Published : Jul 22, 2019, 6:05 PM IST

Updated : Jul 22, 2019, 6:52 PM IST

मुंबई - इस्रोतर्फे आज (सोमवारी) चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 'भारतासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. आपल्या युवापिढीला भविष्यात खूप काही शिकायला मिळणार आहे. भारत नक्कीच चंद्रावर रोव्हर उतरवणारा चौथा देश बनेल.' अशी आशा शास्त्रज्ञ जतीन राठोड यांनी व्यक्त केले. आपण मानवला चंद्रावर पाठवेल तो दिवस दूर नाही असेही राठोड म्हणाले.

तो दिवस दूर नाही ज्यादिवशी आपण चंद्रावर मानव पाठवू - शास्त्रज्ञ जतीन राठोड

चांद्रयान-२ ने काही वेळापूर्वीच अवकाशात झेप घेतली. ठरलेल्या वेळेप्रमाणे श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. या यानाला चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. मागील आठवड्यातील सोमवारी हे प्रक्षेपण होणार होते. मात्र, हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलैला होणारे हे उड्डाण ५६ मिनिटांआधी रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आज, कोणत्याही अडचणी शिवाय हे उड्डाण यशस्वीरित्या पार पडले आहे.

Last Updated : Jul 22, 2019, 6:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details