मुंबई - इंग्लंडमध्ये यावर्षी क्रिकेटचा महाकुंभ अर्थात विश्वचषक स्पर्धा रंगणार आहेत. यासंदर्भात क्रिकेट प्रेमींकडून आतापासूनच वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. अशातच वेस्टइंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारानेही भाकीत वर्तवले आहे. त्याच्यामते यावर्षीचा विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या दोन संघात होण्याची दाट शक्यता आहे.
लारा म्हणाला, इंग्लंडचा संघ खूब प्रबळ आहे. आतापर्यंत या संघाने कुठल्याही महत्वाच्या स्पर्धेत विजय मिळवला नाही. पण, घरच्या खेळपट्टीवर इंग्लंड चांगली कामगिरी करू शकतो. १९७५ नंतर इंग्लंड संघाने विश्वचषक जिंकला नाही. मात्र, १९७९, १९८७ आणि १९९२ या तीन विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीत 'हे' संघ दिसतील 'आमने-सामने', लाराचे भाकीत - india
भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे. २०११ चा विश्वचषक भारताने जिंकला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे आधारस्तंभ आहेत. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजी भारताची नेहमीच डोकेदुखी राहिली आहे, असे लाराने म्हटले आहे.
ब्रायन लारा
दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचेही लाराने कौतुक केले आहे. भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे. २०११ चा विश्वचषक भारताने जिंकला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे आधारस्तंभ आहेत. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजी भारताची नेहमीच डोकेदुखी राहिली आहे, असे लाराने म्हटले आहे. यावर्षीची विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून इंग्लंड येथे खेळली जाणार आहे.
Last Updated : Apr 21, 2019, 12:01 PM IST