मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयकडून सलग 13 दिवस तपास केला जात आहे. याच प्रकरणात रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना सीबीआयने सलग तिसऱ्या दिवशीचौकशीसाठी समन्स पाठवले आहे. इंद्रजित चक्रवर्ती हे आज डीआरडीओ कार्यालयातील सीबीआय पथकासमोर हजर होणार आहेत.
सुशांतसिंह प्रकरण : सलग तिसऱ्या दिवशी इंद्रजित चक्रवर्ती सीबीआय चौकशीसाठी होणार हजर
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयकडून सलग तिसऱ्या दिवशी रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची चौकशी होणार आहे. बुधवारी देखील सीबीआयने त्यांची चौकशी केली होती.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो,व ईडीकडून तपास केला जात आहे. या तपासाअंतर्गत, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स माफिया झैद विलंत्री याला अटक केली आहे. या ड्रग्स माफियाचा संबंध रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीसोबत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभुमीवर, त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, सुशांत मानसिक तणावाखाली असल्याचे आम्हाला 2013 पासून माहीत होते. अशी माहीती सुशांतच्या कुटुंबियांनी दिली आहे. 14 जूनला सुशांतने त्याच्या बांद्रा स्थित घरी आत्महत्या केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. सुशांतची बहिण प्रियांका तनवर , तिचा पती सिद्धार्थ तनवर याबरोबरच बहीण नीतू सिंग यांनी दिलेल्या पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांत मानसिक तणावाखाली असल्याचे आम्हाला 2013 पासून माहित असल्याचे म्हटले होते.