मुंबई - नव्या आर्थिक वर्षात स्कूल बसेसच्या भाड्यात १० ते १५ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे. या निर्णयामुळे चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताना पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
जूनपासून स्कूलबसच्या भाड्यात वाढ; पालकांच्या खिशाला कात्री
वाढती महागाई आणि त्यामुळे झालेली डिझेल दरवाढ, टोलवसुली यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या भाड्यात १० ते १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे.
वाढती महागाई आणि त्यामुळे झालेली डिझेल दरवाढ, टोलवसुली यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या भाड्यात १० ते १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे. शाळांची शुल्क वाढ, त्यात बस असोसिएशन घेतलेला निर्णयामुळे बस भाडेवाढीचाही सामना पालकांना करावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जूनपासून सुरू होणाऱया शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
देशभरात डिझेलच्या किंमती सातत्याने कमी जास्त होत आहेत. त्याचबरोबर बसचालकांकडून पगारवाढीची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीवर तोडगा म्हणून बसचे भाडे वाढवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. वाहनांसाठी विमा, सुरक्षा आणि टोलसाठी रक्कम भरावी लागत आहे. राज्य सरकार स्कूल बस सुरक्षेच्या नावाने विविध नियम लादत लावत आहे. या नियमांची अंमलबजावणी करणे बस मालकांना बंधनकारक असल्याने त्यांना याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच, रस्त्यांवरील खड्डेही देखभाल खर्चात भर घालत आहे. काही पालकांनी हा योग्य निर्णय तर काहींनी निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यामुळे घरची आर्थिक गणित बदलतील, असे काही पालकांनी सांगितले.