महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Crime : अल्पवयीन मुलांना नक्की झाले तरी काय? गुन्हेगारी विश्वात अल्पवयीनांचे वाढते प्रमाण धक्कादायक - minor girl gangrape Mumbai

मुंबईत माटुंग्यातील महापालिकेच्या शाळेत आठवीच्या विद्यार्थीवर अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक बलात्काराने (minor girl gangrape Mumbai) मुंबई (porn videos) हादरली. या अनुषंगाने अल्पवयीनांमधील वाढती गुन्हेगारी (Juvenile crime) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत विभुते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना या (Minor Crime) गंभीर विषयाला हात लावत अल्पवयीन मुले गुन्हेगारी विश्वात का येत आहेत (increasing crime rate in minors) याची कारणे सांगितली आहे. जाणून घेऊया त्यांचे विश्लेषण ...

Minor Crime
अल्पवयीन गुन्हेगारी

By

Published : Dec 7, 2022, 6:58 PM IST

मुंबई :कमी वयात हाती (Juvenile crime) आलेला मोबाईल आणि त्यावर सहज उपलब्ध होणारे पॉर्न व्हिडीओ (porn videos). त्यातून शरीरसंबंध आणि इतर विकृत दृष्टिकोन या बालमनावर परिणाम करतो. बालमनाला या परिणामांची जाणीव नसल्याने घडणारे टोकाचे गुन्हे या विळख्यात अल्पवयीन मुले (juvenile delinquents) सापडली आहेत. साध्या साध्या कारणांवरून हिंसा आणि सूड घेण्याची वृत्ती यामुळे अल्पवयीन मुले (Minor Crime) गुन्ह्याच्या विळख्यात जखडत (increasing crime rate in minors) असल्याचे चित्र माया नगरी मुंबईत घडणाऱ्या घटनांवरून दिसत आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी या घटनांची गंभीर दाखल घेत पालकांना योग्य ते सल्ले दिले आहे.

डॉ. निशिकांत विभुते, मानसोपचार तज्ज्ञ

अल्पवयीन मुलांमध्ये अपराधांचे प्रमाण वाढले :मुंबईत माटुंग्यातील महापालिकेच्या शाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक बलात्काराने मुंबई हादरली. ही घटना ताजी असताना कांदिवली परिसरात इयत्ता दहावीच्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्यावर २६ नोव्हेंबरला त्यांच्या शाळेबाहेर एका वर्गमित्राला चाकू हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली. त्यामुळे नेमके अल्पवयीन मुलांना झालंय तरी काय ? असा प्रश्न सर्वांना सतावतोय. याबाबत अधिक माहिती देताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत विभुते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, अल्पवयीन मुलांमध्ये अपराधांचे प्रमाण वाढते आहे. कारण महत्वाचे कारण आहे आर्थिक अडचण. आर्थिक अडचणीमध्ये पालकांना पैसे कमवण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मुलांचे संगोपन, पालनपोषण आणि त्यांच्यावर होणारे संस्कार याकडे पालकांचे लक्ष राहत नाही.

सामाजिक माध्यमातून चुकीच्या गोष्टीेचे अनुकरण :दुसरे कारण आहे सोशल सपोर्ट सिस्टम म्हणजे कुटुंब व्यवस्था आई आणि वडील दोघे सकाळी कामासाठी जातात आणि संध्याकाळी येतात. तर घरामध्ये इतर कोणीही व्यक्ती नसते. तर त्यावेळेस मुलांवरचे लक्ष कमी होऊन जाते. म्हणजेच आपली सोशल सपोर्ट सिस्टम कमकुवत पडत आहे. वेळ कमी देणे हे तिसरे कारण. आई वडिलांना त्याच्या कामाच्या व्यापामुळे वेळ देता येत नाही. मी टाईम म्हणजे स्वतःला वेळ दिला पाहिजे यात पालक स्वतः स्वतःत बीझी राहतात. मोबाईल पाहण्यात वेळ घालवतात. मग परिणामी मुलांना वेळ कमी दिला जातो. चौथे महत्त्वाचे कारण हे रोल मॉडेलिंग. मुले कोणाला पाहून शिकत आहेत. रोल मॉडेलिंग मध्ये मुले खासकरून विविध माध्यमांमधून ज्या गोष्टी त्यांना दिसतात. त्यांच्यावर आधारित त्यांचे शिक्षण होते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जडणघडण होते ती पूर्णपणे त्यांच्यापर्यंत येणाऱ्या विविध माहितीवर अवलंबून असते. सोशल मीडियामधून, टीव्हीवरून, मित्रांकडून आणि आई वडिलांना पाहून, कधी कधी आईवडिलांमध्ये राग, भांडण हे सर्व जास्त प्रमाणात होते. ते सुद्धा मुलांसमोर होत असते. हे पाहून चुकीचे रोल मॉडेलिंग होते.

चुकीचे व्यक्ती विद्यार्थ्यांचे आदर्श :मुलांना वाटते रागावणे, चिडणे नॉर्मल आणि आवश्यक गोष्ट आहे. कधी कधी मुले सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या व्यक्तीला आपला आदर्श मानतात आणि त्या आदर्शानुसार आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने वागले पाहिजे असे मुलांना वाटते. ती विशिष्ट पद्धत चुकीची असू शकते. आता या सर्व फॅक्टर्समध्ये मुलांमध्ये विविध प्रकारच्या अपराधांचे प्रमाण वाढत आहे. तर ह्या सर्व गोष्टींमधून बाहेर येण्यासाठी कोणते फॅक्टर्स ते पाहता येऊ शकतात तर मुलांच्या पालन-पोषणाकडे लक्ष दिले पाहिजे. पालनपोषण म्हणजे काय तर मुलांच्या फक्त चुका न काढता त्यांच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष देणे. पालकांना क्वालिटी टाईम देता आला पाहिजे अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत विभुते यांनी दिली आहे.

माटुंग्यातील शाळेत विद्यार्थिनीवर गॅंगरेप : माटुंग्यातील पालिकेच्या शाळेत वर्गातील विद्यार्थी डान्सच्या तासासाठी बाहेर जातात. आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी 13 वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी 28 नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला आहे. अस्वस्थ वाटत असल्याने पीडित मुलगी वर्गातच थांबली होती. याचाच गैरफायदा घेत वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी दरवाजा बंद करून तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. कुणाकडे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली.


विद्यार्थ्यावर चाकू हल्ला : कांदिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी १ डिसेंबरला इयत्ता दहावीच्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्यावर २६ नोव्हेंबरला त्यांच्या शाळेबाहेर एका वर्गमित्राला चाकू हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली. हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. एका स्थानिक रहिवाशाने चित्रित केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी कांदिवली पोलीस तपास करत आहेत. जखमी विद्यार्थ्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.


नऊ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या : कल्याण स्टेशन परिसराजवळच्या सोसायटीच्या आवारात गुरुवारी सकाळी एक नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. हे अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार करून नंतर तिची गळा चिरून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहेत. मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून हे कृत्य केलाचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details