महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे उद्घाटन - मुंबई विद्यापीठ बातमी

शाहिरीच्या भुमिकेमधील विश्वासमक्ता, साहित्यातील योगदान, सुमारे 27 पेक्षा अधिक भाषांमध्ये ज्यांचे साहित्य पोहोचलेले आहे अशा थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची मूळ जाणीव ही मानवतावादी आहे. याच मानवतावादाची विश्वात्मक प्रेरणा देणारे हे अध्यासन केंद्र व्हावे असा आशावाद 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला.

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ

By

Published : May 20, 2021, 10:29 PM IST

मुंबई -शाहिरीच्या भुमिकेमधील विश्वासमक्ता, साहित्यातील योगदान, सुमारे 27 पेक्षा अधिक भाषांमध्ये ज्यांचे साहित्य पोहोचलेले आहे अशा थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची मूळ जाणीव ही मानवतावादी आहे. याच मानवतावादाची विश्वात्मक प्रेरणा देणारे हे अध्यासन केंद्र व्हावे असा आशावाद 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन झालेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यावेळी ते बोलत होते.

प्रेरणा देणारे अध्यासन केंद्र व्हावे

सबंध विश्वाला कवेत घेण्याची प्रतिभा ज्या दूर्मिळ साहित्यांमध्ये आहे त्यापैकी एक म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याकडे पाहिले जाते. दुभंगलेल्या सर्व मानवतेला एका सुत्रामध्ये बांधण्याचे काम अण्णाभाऊंचे साहित्य करीत असल्याचेही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सन्माननीय उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह या केंद्रांचे संचालक तथा प्र.कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अध्यासन केंद्राची स्थापना

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले की, आजचा आपण जो महाराष्ट्र बघतो आहोत त्याच्या जडणघडणीत ज्या थोर महनीय व्यक्तींचे योगदान आहे. त्याच पंक्तीतील थोर लेखक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव आदराने घेतले जाते. शाळेची पायरी न चढणारे मात्र त्यांच्याकडील असलेल्या प्रचंड बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती केली हे विलक्षणीय आहे. त्यांच्या साहित्यावर अभ्यास व्हावा, पुढील पीढीला मार्गदर्शन उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाने या अध्यासन केंद्राची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

साहित्यावर संशोधन होणार

उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सयुंक्त विद्यमाने 1 ऑगस्ट,2020 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमात या अध्यासन केंद्रांची घोषणा करण्यात आली होती. आज (दि. 20मे) प्रत्यक्षात या केंद्राचे उद्घाटन होत असल्याचा आनंद अधिक असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर अधिकाधिक अभ्यास आणि संशोधन केले जाणार असल्याचा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अनेक उपक्रम राबवणार

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्र. कुलसचिव तथा या अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड यांनी सांगितले की, या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्याचा मानस आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहीत्याचे इतर उर्वरीत भाषांमध्ये भाषांतर करणे, सर्टीफिकेट कोर्सेस, शॉर्ट फिल्म्स, कला, शाहीरी यांचा अभ्यास या केंद्राच्या माध्यमातून केला जाणार आहे.

हेही वाचा -Corona Update : राज्यात गुरुवारी 47 हजार 371 जण कोरोनामुक्त; 29 हजार 911 नवे बाधित

ABOUT THE AUTHOR

...view details