मुंबई - मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकातील नविन पादचारी पूलाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे हा पूल आता प्रवाशांना वापरता येणार आहे. 74 मीटर लांब व 6 मीटर रुंद असलेल्या या पुलामुळे प्रवाशांना फलाटावर वेळेत पोहचण्यास मदत होणार आहे.
मुलुंड रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलाचे झाले उद्घाटन, फलाटावर वेळेत पोहचण्यास होणार मदत - पादचारी
मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकातील नविन पादचारी पूलाचे शनिवारी उदघाटन करण्यात आले.
मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील हा पादचारी पूल माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता. या पादचारी पूलासाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हा नवीन पादचारी पूल मुलुंड पश्चिममधील पार्किंगच्या जागेपासून सुरू होतो आणि प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3 आणि 4 ला जोडतो आणि मुलुंड पूर्वेला बाहेर पडतो, अशा प्रकारे मुलुंड पूर्व ते पश्चिम पर्यंत प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी हा पादचारी पूल वरदान ठरणार आहे.
यावेळी मुलुंडमधील भाजप नगरसेवक, वरिष्ठ रेल्वे अधिकारी डीसीएम पंवार, डीसीएम कोंडिया, वरिष्ठ डीईएम आणि मुलुंड स्टेशन मास्टर जी. डी. बरनवाल उपस्थित होते.