महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईमध्ये एका महिन्यात ३७ हजार सक्रिय कोरोना रुग्ण - ३७ हजार सक्रिय कोरोना रुग्ण

१ जानेवारीला ८ हजार ५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. फेब्रुवारी महिन्यात घट होऊन १ फेब्रुवारीला ५ हजार ६५६ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. २८ फेब्रुवारीला यात वाढ होऊन ९ हजार ७१५ सक्रिय रुग्णांची नोंद झाले. १ मार्चला ९ हजार ६९० सक्रिय रुग्ण होते. १५ मार्चला १४ हजार ५८२, २५ मार्चला ३३ हजार ९६१ तर २९ मार्चला ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. १ मार्च ते २९ मार्च या महिनाभराच्या काळात तब्बल ३७ हजार ७६३ सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

मुंबई कोरोना
मुंबई कोरोना

By

Published : Mar 30, 2021, 7:45 PM IST

मुंबई -मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. काही प्रमाणात हा प्रसार कमी झाला असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला आहे. अशातच आता सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या महिनाभरात सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजार ७६३ ने वाढली असून सध्या मुंबईत ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रसार झाला. पालिकेने केलेल्या प्रयत्नामुळे कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला. यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होवून रुग्णसंख्या ५ ते ६ हजारावर गेली आहे. २९ मार्च रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ लाख ४ हजार ५६२ वर पोहचला आहे. मृत्यूचा आकडा ११ हजार ६६१ वर पोहचला असून ३ लाख ४४ हजार ४९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्ण आहेत.

अशी झाली सक्रिय रुग्णांमध्ये वाढ
१ जानेवारीला ८ हजार ५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. फेब्रुवारी महिन्यात घट होऊन १ फेब्रुवारीला ५ हजार ६५६ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. २८ फेब्रुवारीला यात वाढ होऊन ९ हजार ७१५ सक्रिय रुग्णांची नोंद झाले. १ मार्चला ९ हजार ६९० सक्रिय रुग्ण होते. १५ मार्चला १४ हजार ५८२, २५ मार्चला ३३ हजार ९६१ तर २९ मार्चला ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. १ मार्च ते २९ मार्च या महिनाभराच्या काळात तब्बल ३७ हजार ७६३ सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

८१ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण
मुंबईत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातील ८१ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. १८ टक्के लक्षणे असलेले रुग्ण आहेत. तर १ टक्का रुग्ण क्रिटिकल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details