मुंबई- मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास सुकर, गार आणि सुपरफास्ट व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रोचे जाळे विणले जात आहे. या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 च्या कामाला आता वेग मिळाला आहे. त्यानुसार शुक्रवारी (22 जानेवारी) बालकूम येथे 60 मेट्रिक टनाचा पहिला पिलर बसवण्यात आला आहे. तर आतापर्यंत 29 किलोमिटर मार्गापैकी 12.70 किलोमिटरचे आणि 6 मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. यानुसार 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करत नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएकडून जाहीर करण्यात आले आहे.
असा आहे प्रकल्प
ठाणे-भिंवडी-कल्याण हा मेट्रो 5 प्रकल्प एकूण 29 किलोमिटर लांबीचा आहे. तर यात एकूण 15 मेट्रो स्थानके आहेत. या प्रकल्पाचे काम मे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले आहे. सप्टेंबर 2019 पासून या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर आत 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.