महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना प्रकल्पग्रस्तांना तत्काळ जमीनवाटप करा - मंत्री विजय वडेट्टीवारांचे आदेश

कोयना प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करताना प्रत्येक जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे तपासणी करावी, अशा सूचना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या. (Minister Vijay Wadettiwar on koyna project) कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या पर्यायी जमिनींबाबत सातारा, सागंली, सोलापूर, रायगड, ठाणे तसेच पालघर या जिल्ह्यांनी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम करून घ्याव्यात तसेच प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या जमिनींचे वर्गीकरण करावे, असेही ते म्हणाले.

Minister Vijay Wadettiwar
मंत्री विजय वडेट्टीवार

By

Published : Nov 16, 2021, 9:07 PM IST

मुंबई - कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या पर्यायी जमिनींबाबत सातारा, सागंली, सोलापूर, रायगड, ठाणे तसेच पालघर या जिल्हा प्रशासनांनी पात्र लाभार्थ्यांना मान्य असलेली जागा वाटपाची कार्यवाही तत्काळ करावी, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. (Immediate allot land to Koyna project victims) सह्याद्री अतिथीगृह येथे कोयना प्रकल्प पुनर्वसनाचा आढावा बैठक आज (मंगळवारी) झाली. या बैठकीत वडेट्टीवार बोलत होते. (Minister Vijay Wadettiwar on koyna project)

काटेकोरपणे तपासणी करावी -

कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या पर्यायी जमिनींबाबत सातारा, सागंली, सोलापूर, रायगड, ठाणे तसेच पालघर या जिल्ह्यांनी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम करून घ्याव्यात तसेच प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या जमिनींचे वर्गीकरण करावे. जेणेकरून लाभार्थ्यांनाही माहिती मिळेल. तसेच ज्या ठिकाणी जमिन उपलब्ध नाही अथवा काही अडचण असेल अशा ठिकाणांबाबत प्रस्ताव विभागाकडे पाठवावा जेणेकरून त्यावरती तत्काळ कार्यवाही करता येईल. ज्या जमिनींचे वाटप करताना प्रत्येक जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे तपासणी करावी अशा सूचना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.

हेही वाचा -राज्य सरकार गुन्हेगार व दहशतवाद्यांचे समर्थक.. ठाकरे सरकारकडून हिंदू धर्म व महाराष्ट्र धर्मावर घाला - आशिष शेलार

बैठकीला कोण उपस्थित?

मदत व पुनर्वसनचे प्रधानसचिव असीम गुप्ता, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील, कोकण पुनर्वसन विभागाचे आयुक्त पंकज देवरे, पुनर्वसन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख, अपर जिल्हाधिकारी पालघर दिलीप गुट्टे, अमोल यादव (रायगड), डॉ. स्वाती देशमुख (सांगली), संजय शिंदे (रत्नागिरी), वैदही रानडे (ठाणे) यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details