महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांतील उद्योजक घडवण्यासाठी आयआयटी मुंबईचा पुढाकार

आयआयटी मुंबईतून दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात त्यांच्यातील हुशारीची पारख करून अनेक देशी विदेशी कंपन्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या त्यांना देतात. आयआयटी मुंबईच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत असल्या तरी आता उद्योजक घडवण्याकडे लक्ष देण्याचा निर्णय आयआयटी मुंबईने घेतला आहे.

विद्यार्थ्यांतील उद्योजक घडवण्यासाठी आयआयटी मुंबईचा पुढाकार

By

Published : Apr 27, 2019, 12:18 PM IST

मुंबई - आयआयटी मुंबईतून दर वर्षी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध कंपन्या नोकऱ्या देतात त्यातून विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये उत्तम काम मिळते, चांगला पगार मिळतो. आता आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी छोटे कोर्सेस व व्यापाराशी संबंधित बाजारपेठेची माहिती व संशोधनासाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांतील उद्योजक घडवण्यासाठी आयआयटी मुंबईचा पुढाकार -

आयआयटी मुंबईतून दर वर्षी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध कंपन्या नोकऱ्या देतात. त्यातून विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये उत्तम काम मिळते चांगला पगार मिळतो. आता आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी छोटे कोर्सेस व व्यापाराशी संबंधित बाजारपेठेची माहिती व संशोधनासाठी विविध कंपन्या सोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयआयटी मुंबईतून दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात त्यांच्यातील हुशारीची पारख करून अनेक देशी विदेशी कंपन्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या त्यांना देतात. आयआयटी मुंबईच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत असल्या तरी आता उद्योजक घडवण्याकडे लक्ष देण्याचा निर्णय आयआयटी मुंबईने घेतला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक समस्या परवानग्या आर्थिक पाठबळ लागते. उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात अशा मोठ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आयआयटी मुंबईने जे माझी विद्यार्थी यशस्वी उद्योजक झाले आहेत. त्यांची मदत घेऊन एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर व छोटे कोर्सेस चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उत्तीर्ण विध्यार्थी यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशी-विदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माजी उत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबर आयआयटी मुंबई विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून घेणार आहे. संशोधनात अधिक लाभ सर्वसामान्यांना व्हावा यासाठी या मोहिमेवर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती आयआयटी मुंबईचे नवनियुक्त संचालक सुभासिस चौधरी यांनी दिली आहे. चौधरी यांनी प्रथमच आयटी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आयआयटी मुंबईचे अकॅडमी अँड इन्फ्रास्ट्रक्चर अफेअरचे प्रमुख प्राध्यापक ए के सुरेश फायनान्स अँड एक्स्टर्नल असरचे प्राध्यापक पी एम मुजुमदार उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव -

अनेक विद्यार्थी हे आई-वडिलांच्या दबावामुळे अभियंता होण्यासाठी आयआयटीत प्रवेश घेतात. त्यांचा अभियांत्रिकीत रस नसतो ही बाब लक्षात घेऊन अशा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील अन्य गुणांना चालना देण्यासाठी लिब्रल स्टेम ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २०२० मध्ये आयटी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया राबविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



ABOUT THE AUTHOR

...view details