मुंबई :दर्शन याचा मृत्यू हा जातीय भेदभावाच्या दिलेल्या वागणुकीमुळे झाल्याचा आरोप आयआयटी मुंबई येथीलविद्यार्थी संघटना आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलने केला आहे. तसेच त्याच्या नातेवाईकांनी देखील केला आहे. यासंदर्भात आयआयटी मुंबईने समांतर तपास सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पोलीस देखील तपास करीत आहेत. मात्र अद्यापही हे प्रकरण मिटण्याचे चिन्ह नाही. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढला.
आयआयटी मुंबई विद्यार्थी दर्शन सोळंकी :दर्शन सोळंकी हा विद्यार्थी आयआयटी मुंबई या ठिकाणी रसायनशास्त्र अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी शिक्षण घेत होता. तो अत्यंत हुशार विद्यार्थी असल्याचे त्याच्या आजूबाजूच्या वर्ग मित्रांनी देखील अनेकदा सांगितले. तरीही त्याने याआधी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा तो प्रयत्न केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस आयआयटी मुंबईमधील जातीय भेदभावाची वागणूक कारणीभूत असल्याचे त्याचे मित्र वारंवार सांगत आहेत. तसेच त्याचे काका देवांग कुमार यांनी देखील तसे नमूद केलेले आहे. मात्र या दृष्टिकोनातून अत्याचार भेदभाव झाला अशी तपासणी केली जात नाही म्हणून विद्यार्थ्यांनी हा मार्च काढला.
तपास सुरू :दरम्यान हे प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी आयआयटी मुंबई यांच्यावतीने प्रशासनाने स्वतंत्र प्राध्यापकाच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करत असल्याचे देखील दोन दिवसापूर्वी जाहीर केले. तसेच पोलिसांनी देखील तपास सुरू केला असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेल आहे. त्या अनुषंगाने दर्शन सोळंकी याचा लॅपटॉप आणि वापरत असलेला मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे नेलेला आहे. प्रयोगशाळेमधून त्यासंदर्भातील अहवाल पूर्ण आल्याशिवाय त्या संदर्भात अधिक माहिती मिळू शकणार नाही. मात्र आयआयटी मुंबई येथे विद्यापीठाच्या प्रशासनाने अनुसूचित जाती जमाती यांच्या संदर्भातील जे वैद्यकीय आणि मानसिक उपचारा संदर्भातील काम जे एससी, एसटी सेल किंवा स्टुडन्ट वेलनेस सेंटर यांनी करायला पाहिजे होते. ते न केल्यामुळे देखील दर्शन सोळंकी याचा मृत्यू आयआयटी मुंबई रोखू शकले नाही. असा आरोप देखील विद्यार्थ्यांकडून केला जातो आहे. त्याला कोणी कोणी जातीय भेदभावाची वागणूक दिली. या संदर्भात तपास होणे जरुरी आहे यावर विद्यार्थी ठाम आहे.
मृत्यूच्या मागे जातीय भेदभावाचे कारण :या सर्व पार्श्वभूमीवरच विद्यापीठाकडून दर्शन सोळंकी याच्या मृत्यूच्या मागे जातीय भेदभावाचे कारण आहे. त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. ही त्याच्या कुटुंबीयांकडची मागणी आणि विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने जोरधरत आहे. त्यामुळेच काल रात्री मुंबई आयआयटी येथे आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी कॅन्डल मार्च काढला दर्शनला श्रद्धांजली वाहिली. दरम्यान काल या घटनेच्या संदर्भात सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आयआयटी मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी देखील भेट दिली. प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यासोबत वार्तालाप करून घटने संदर्भातले गांभीर्य समजावून घेतले. त्यांनी ई टीवी भारत सोबत संवाद साधताना म्हटलेलं आहे की कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये अशा घटना घडायला नको. यासंदर्भात निश्चित काही उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :Sanjay Raut News: संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांबद्दल चाटूगिरी शब्द वापरल्याने बदनामीची शिंदे गटाकडून तक्रार