मुंबई :गुजरातमधील राहणारा आणि दलित समूहातून आलेला दर्शन सोळंकी याने 12 फेब्रुवारी रोजी वस्तीगृहात केली होती. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आणि त्याच्या पालकांनी हा जाती भेदभावामधून झालेला मृत्यू आहे, असा आरोप देखील केला होता. आता यासंदर्भात विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. आयआयटी मुंबई या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2023 रोजी दर्शन सोळंकी या रशियन शास्त्र प्रथम वर्ष अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या वस्तीगृहात आत्महत्या केली आहे.
संस्थात्मक खून असल्याचा आरोप :उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यापाठीमागे जाती भेदभाव हे प्रकरण समोर आले. त्याचे कारण आयआयटी या ठिकाणी चार वर्षात अनिकेत अंभोरे आणि त्यानंतर आता दर्शन सोळुंके यांच्या या पद्धतीने आत्महत्या करण्यामागे जातीय भेदभावाचा सामना करावा लागला, हे खरे कारण असल्याचे दोघांच्याही कुटुंबांनी आरोप केला होता. विद्यार्थी संघटनांनी अनिकेत अंभोरेच्या मृत्यूनंतर संस्थात्मक खून असल्याचा आरोप केला.
विद्यार्थ्यांनी कॅंन्डल मार्च काढला : दोन वेळा कॅंन्डल मार्च काढला. पाच-सात दिवसापूर्वीच विद्यार्थ्यांनी पुन्हा मार्च काढून स्वतंत्र चौकशी करावी, आत्महत्या ही जातीय भेदभावातून झालेली आहे किंवा नाही याचा देखील तपास करावा, अशी मागणी केली होती. त्यामुळेच मुंबई संयुक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे लखमी गौतम यांच्या पुढाकारांमध्येही विशेष तपास पथक स्थापन केलेले आहे. तसेच या पथकामध्ये शोध विभाग याचे डीसीपी के. उपाध्याय आणि एसीपी सांताक्रुज विभाग चंद्रकांत भोसले इतर सदस्य मिळून हे विशेष तपास करणार आहेत.